मुंबई / नजर सहयाद्री - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभा मुंबईच्या बीकेसीवर पार पडली. मुंबईतील पंतप्रधान च्या या सभेत राष्ट्रीय सुरक्...
मुंबई / नजर सहयाद्री -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभा मुंबईच्या बीकेसीवर पार पडली. मुंबईतील पंतप्रधान च्या या सभेत राष्ट्रीय सुरक्षा रक्षक नावाचे बनावट ओळखपत्र वापरून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स पोलिसांनी एका ३५ वर्षीय व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.
एका वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार, गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबईच्या बीकेसीमधील जाहीर सभेत राष्ट्रीय सुरक्षा रक्षक नावाचे बनावट ओळखपत्र वापरून तरुणाने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. हा तरुण नवी मुंबईचा रहिवासी आहे. तो भारतीय सैन्याच्या गार्ड रेजिमेंटचा शिपाई असल्याचा दावा करत आहे. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे.
एमएमआरडीए मैदानावरील प्रवेश द्वारावर व्यवस्थापन करणाऱ्या पोलिस कर्मचार्यांच्या पथकाने मिश्रा यांना अडवले आणि पुढे ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
दुसऱ्या घटनेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसापूर्वी मुंबई दौऱ्यावर होते. त्यांची बीकेसी येथील मैदानात सभा होती. नेमकं याच परिसरातून एका व्यक्तीला मुंबई पोलिसांनी घातक शस्त्रासह ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुंबई पोलिसांची ही मोठी कारवाई केली आहे.पोलिसांच्या तपासात ३९ वर्षीय तरुण आरोपी नाव आहे. हा तरुण हॉटेल व ट्रान्सपोर्टचं काम करत असून तो भिवंडी ग्रामीणचा राहणारा असल्याचे तपासात समोर आले आहे.
COMMENTS