मुंबई / नगर सहयाद्री- राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यात मोठ्या महानगरपालिकांमध्ये ...
मुंबई / नगर सहयाद्री-
राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यात मोठ्या महानगरपालिकांमध्ये स्वीकृत नगरसेवकांची संख्या 10 करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे लहान महानगरपालिकांमध्ये सदस्य संख्येच्या १० टक्के स्विकृत नगरसेवक होऊ शकतात.
मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार आता महापालिकेत ५ नाही तर १० स्वीकृत नगरसेवक असतील. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक या मोठ्या महापालिकेत किमान दहा स्वीकृत सदस्य असतील.
महापालिकेत एकूण सदस्य संख्येच्या दहा टक्के स्वीकृत नगरसेवक होऊ शकतात किंवा दहा स्वीकृत नगरसेवक स्वीकृत होऊ शकतात. यापैकी जी संख्या छोटी असेल त्यानुसार स्वीकृत सदस्यांची निवड होणार आहे.
COMMENTS