कर वसुलीत कामचुकारपणा करणार्या कर्मचार्यांना आर्थिक दंड अहमदनगर । नगर सह्याद्री शहरातील मालमत्ता धारकाकडील थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी नेमल...
कर वसुलीत कामचुकारपणा करणार्या कर्मचार्यांना आर्थिक दंड
अहमदनगर । नगर सह्याद्री
शहरातील मालमत्ता धारकाकडील थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी नेमलेल्या कर्मचार्यांनी 6 महिन्यांचा कालावधी लोटला तरी समाधानकारक कामगिरी न केल्याने अशा कामचुकार कर्मचार्यांवर महापालिका आयुक्त डॉ.पंकज जावळे यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. या कर्मचार्यांवर आर्थिक दंडाची कारवाई करण्यात आली असून येत्या मार्च अखेर पर्यंत थकीत कराची 100 टक्के वसुली झाली नाही तर अधिक कडक कारवाईची इशारा दिला आहे.
मालमत्ता कर वसुलीबाबतची आढावा बैठक आयुक्त जावळे यांनी शुक्रवारी (दि.6) दुपारी घेतली. यावेळी उपायुक्त सचिन बांगर, आस्थापना विभाग प्रमुख अशोक साबळे, करसंकलन अधिकारी व्ही.जी.जोशी यांच्यासह सर्व प्रभाग अधिकारी तसेच वसुलीसाठी नेमलेले कर्मचारी उपस्थित होते. या वसुलीचा आढावा घेताना सर्वच ठिकाणी असमाधानकारक वसूल असल्याचे आढळून आल्यावर आयुक्त जावळे चांगलेच संतापले.
6 महिन्यांपासून नेमणूक केलेली असतानाही कर्मचारी फक्त कारवाईचा देखावा करत असल्याचे दिसून आल्याने आयुक्तांनी ज्या कर्मचार्यांची वसुली 20 टक्के पेक्षा कमी झालेली आहे त्यांना 5 हजारांचा दंड व ज्यांची 30 टक्क्यांपेक्षा कमी आहे त्यांना 3 हजारांचा दंड करण्याचे आदेश वसुली विभागाला दिले.
अनधिकृत नळकनेक्शन मोठ्या प्रमाणात आहेत ते शोधा, त्या नागरिकांवर कारवाई करा.येत्या मार्च अखेरपर्यंत थकीत मालमत्ता कराची 100 टक्के वसुली झाली पाहिजे.
महापालिका ही तुमची आहे, पण जर ती तुम्हाला आपली वाटत नसेल तर आता कोणाचीही गय केली जाणार नाही. जे कर्मचारी कामचुकारपणा करताना आढळतील त्यांच्यावर कारवाईचे अधिकार प्रभाग अधिकार्यांना आहेत. त्यांनी ती करावी अन्यथा मला प्रभाग अधिकार्यांवरच कारवाई करावी लागेल.असाही इशारा आयुक्त डॉ.जावळे यांनी दिला
COMMENTS