नागपूर / नगर सहयाद्री- महाविकास आघाडीतील शिक्षक भरती पाठोपाठ आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना समर्थीत महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेनही आपला उ...
नागपूर / नगर सहयाद्री-
महाविकास आघाडीतील शिक्षक भरती पाठोपाठ आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना समर्थीत महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेनही आपला उमेदवार उभा केलाय. विधान परिषदेच्या नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत आघाडीत बिघाडी झालीय. उद्या उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.
काँग्रेस ने अजून आपलं समर्थन किंवा उमेदवार जाहीर केला नाहीय. तिकडे भाजपची 'वेट अँड वॉच' च्या भूमिकेत आहे. राज्यातील पाच शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत दोन जागा काँग्रेस आणि दोन जागा राष्ट्रवादीसाठी सोडण्यात आल्या आहेत. नागपूरच्या जागेवर काँग्रेसनं दावा केलाय.
आता शिक्षक सेनेनं उमेदवार देऊन काँग्रेस पुढं आव्हान उभं केलंय. शिक्षक सेनेकडून गंगाधर नाकाडे यांना उमेदवार जाहीर केलीय. 'वरिष्ठांच्या सूचनेवरून आपली निवडणूक रिंगणात असून राष्ट्रवादी ने आपल्याला समर्थन दिलंय, असा दावा नाकाडे यांनी केलाय.
तसंच 'काँग्रेसनही समर्थन जाहीर करून नागपूरची जागा शिवसेनेसाठी सोडावी', असं आवाहनही त्यांनी केलंय. मात्र, सेनेच्या उमेदवारामुळं महाविकास आघाडी मध्ये फूट पडल्याचं दिसतंय. याचा फायदा भाजप समर्थित उमेदवाराला होण्याची शक्यता आहे.
COMMENTS