करण गहांडुळे, आराध्या गायकवाड, शिवम शिंगारे, धनेश टकले, शीतल भंडारी यांना विजेतेपद पारनेर । नगर सह्याद्री नागेश्वर मित्र मंडळाच्या वतीने आयो...
करण गहांडुळे, आराध्या गायकवाड, शिवम शिंगारे, धनेश टकले, शीतल भंडारी यांना विजेतेपद
पारनेर । नगर सह्याद्री
नागेश्वर मित्र मंडळाच्या वतीने आयोजित 20 व्या राज्यस्तरीय पारनेर मॅरेथॉन स्पर्धेत आराध्या गायकवाड, शिवम शिंगारे, धनेश टकले, करण गहांडुळे यांनी विजेतेपद पटकावले. स्पर्धेत 840 स्पर्धकांनी सहभाग घेतला. तब्बल 21 बक्षिसे पटकावून ढवळपुरी आश्रमशाळेने मॅरेथॉन स्पर्धेवर स्वतःचे वर्चस्व गाजवले.
पारनेर मॅरेथॉन स्पर्धेसाठी राज्यभरातून अनेक स्पर्धक शुक्रवारी रात्री शहरात दाखल झाले होते, सकाळी पारनेर बाजारतळ जवळ नगराध्यक्ष विजय औटी, उपनगराध्यक्ष सुरेखा भालेकर, सभापती योगेश मते,आरोग्य सभापती डॉ विद्या कावरे, , प्राचार्य रंगनाथ आहेर, एनसीसी प्रमुख प्रा भरत डगळे ,शाहीर गायकवाड, बापूराव होळकर, लतिफ राजे,प्रा संजय गायकवाड, निलेश खोडदे यांच्या हस्ते प्रारंभ झाला तर , पोलीस निरीक्षक घनश्याम बळप, जय मातादी उद्योग समूहाचे मारुती रेपाळे,,सह्यादी एजन्सी चे अश्विन कोल्हे, आनंद मेडिकल फाऊंडेशन चे प्रमुख डॉ सादिक राजे, भिकाजी जगदाळे,दत्तात्रय अंबुले यांच्या हस्ते करण्यात आला.
पारनेर मॅरेथॉन स्पर्धा पारनेर च्या मुख्य वेशीजवळून सुरू झाले वर शहीद बाबासाहेब कावरे नवी पेठ, नागेश्वर वसाहत, सह्याद्री एजन्सी, हिंद चौक पर्यत रस्त्याच्या दुतर्फा राहून ग्रामस्थांनी खेळाडू ना टाळ्या वाजवून प्रोत्साहन दिले.स्पर्धेसाठी पारनेर पोलीस ठाणे, पारनेर नगरपंचायत, पारनेर महाविद्यालयाचे एनसीसी विद्यार्थी सुरक्षा रक्षक, इंदिरा गांधी नर्सिंग कॉलेज च्या विद्यार्थीनी, 108 रुग्णवाहिका चे डॉ नरेंद्र मुळे, शिवाजी औटी, यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली.
स्पर्धेतील विजेते- पहिली ते चौथी -मुली आराध्या गायकवाड, पानोली, शक्तीला कोंडरे, कल्पना डोमाले, संस्कृती कोळेकर, आश्रमशाळा, ढवळपुरी, ज्ञानेश्वरी रासकर, वासुंदे,पूजा झिटे, ढवळपुरी, श्रेया शेंडकर, लोणी मावळा, मुले--शिवम शिगारे, सोहम खरात, ओकार घुले, बाबूलाल गोंडे, ढवळपुरी, किसन प्रजापती, पवारवाडी, सुपा, सिद्धेश तिखोले, संदीप करगळ,भाळवणी
पाचवी ते सातवी मुले--धनेश टकले, गौरव गाडे, विठ्ठल टकले, ढवळपुरी, आश्रमशाळा, प्रतिक जिरेकर पानोली, आकाश होंडा, सुपा, सोनबा टकले, ढवळपुरी, आदित्य निमसे, कान्हूर पठार, मुली--कविता खताळ, सोनाली राठोड, ढवळपुरी, अंकिता गायकवाड, पानोली, गीता पवार, आफिया शेख,ढवळपुरी, ज्योती शिंदे, पानोली, खुशी डोमाले, आठवी ते दहावी मुले--सुरेश एनपुरे, अळकुटी,अजित पांढरे, गाजीभोयरे,प्रथमेश परांडे,विराज परांडे, न्यू इंग्लिश स्कूल पारनेर,ओंकार कदम, भाळवणी, सूरज पांढरे, गंजीभोयरे, सुजल सोनावळे, कान्हूर पठार, प्रिया गुळवे, तनुजा आतकर,अळकुटी,शिवानी शेळके, कान्हूर पठार, अश्विनी रेपाळे, पुणेवाडी, साक्षी तांबे, ढवळपुरी, सुचिता पिंपरकर, पारनेर, सिद्धी खणसे, गांजीभोयरे, खुला गट मुले-करणं गहाणडुळे, अळकुटी,रोहित बिननर, संगमनेर, नवनाथ बाचकर, टाकळी ढोकेशर, ज्ञानेश्वर गवडेगुंडा, संजय गवडेगुंडा, नारायणगाव, पवन जाधव, ढवळपुरी, सावळेराम शिंदे, नगर मुली-- शीतल भंडारी, भाग्यश्री भंडारी, साक्षी भंडारी, पारनेर महाविद्यालय,वेदिका मंडलीक, नाशिक, अंजली पंडित, नाशिक, मीरा हांडे, पळसपूर, ऋतुजा सोमवंशी
COMMENTS