मुंबईतील घाटकोपर भागात शनिवारी एका मतिमंद मुलीवर तीन अल्पवयीन मुलांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मुंबई / नगर सह्याद्री -
मुंबईतील घाटकोपर भागात शनिवारी एका मतिमंद मुलीवर तीन अल्पवयीन मुलांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित मुलगी शौचास गेली असता आरोपीने ही घटना घडवली. आरोपींनी पीडितेला शौचालयातच नेऊन बलात्कार केले आणि तिचा अश्लील व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर अपलोडही केला. सध्या पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेऊन बालसुधारगृहात पाठवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मतिमंद मुलगी शौचालयाला गेली होती. दरम्यान, तीन अल्पवयीन आरोपींनी पीडितेला पकडून शौचालयात नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने पीडितेचा अश्लील व्हिडिओही बनवला आणि नंतर तो सोशल मीडियावर अपलोड केला. हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि पीडितेच्या भावापर्यंत पोहोचला. त्यानंतर पीडितेच्या भावाने याबाबत कुटुंबीयांना सांगितले.
नातेवाईकांनी या घटनेची माहिती घाटकोपर पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास करत एका अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले असून पोलीस या प्रकरणाच्या तपास करत आहेत.
COMMENTS