मुंबईतील कुर्ला पश्चिम भागातील शिवाजी मार्केटजवळ रविवारी रात्री भीषण आग लागली आणि ती अनेक दुकानांमध्ये पसरली.
मुंबई / नगर सह्याद्री -
मुंबईतील कुर्ला पश्चिम भागातील शिवाजी मार्केटजवळ रविवारी रात्री भीषण आग लागली आणि ती अनेक दुकानांमध्ये पसरली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.
आपत्ती नियंत्रण व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री १०.३० वाजता आग लागली. कुर्ला पश्चिम येथील शिवाजी मार्केटमधील एका गल्ल्यात आग लागली, जी नंतर सुमारे २०-२५ गाळ्यांमध्ये पसरली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल एक रुग्णवाहिका, आठ मोटरपंपांसह घटनास्थळी पोहोचले. पहाटे ५.३४ वाजताआग विझवण्यात आली, असे त्यांनी सांगितले.
COMMENTS