रेसिडेंन्शिअल हायस्कूलचे शिष्यवृत्ती परिक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव अहमदनगर । नगर सह्याद्री शैक्षणिक प्रगतीत जिल्हा मराठाच्या महा...
रेसिडेंन्शिअल हायस्कूलचे शिष्यवृत्ती परिक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव
अहमदनगर । नगर सह्याद्री
शैक्षणिक प्रगतीत जिल्हा मराठाच्या महाराष्ट्र बालक मंदिर, रेसिडेंन्शअल, न्यू आर्टस, न्यु लॉ, छत्रपती इंजि.चे विद्यार्थी जिल्ह्यात कायमच टॉपर राहिले आहेत. जिल्हा मराठा संस्था विद्यार्थांना घडवते, आणि समाजात त्यांची लँडमार्क म्हणून ओळख निर्माण करत असल्याचे मत जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नंदकुमार झावरे यांनी व्यक्त केले.
झावरे म्हणाले, एकदा विद्यार्थी महाराष्ट्र बालक मंदिरमध्ये प्रवेश घेतला की त्याचा पाया रचला जातो, रेसिडेंन्शिअलमध्ये त्याची जडणघडण होते, न्यू आर्टस, न्यु लॉ, छत्रपती इंजी. मधून एक आदर्श अधिकारी, नागरिक तयार होतो. असे जिल्हा मराठाच्या युनिटमध्ये तयार झालेले गुणवंत देशात राज्यात आपला डंका वाजवत आहे. यावेळी खानदेशे म्हणाले, ग्रामीण भागातून आलेले विद्यार्थी आज संस्थेच्या विविध परिक्षेत टॉपर राहुन आयएएस, आयपीएस च्या परिक्षेचा पाया रचत आहेत. यावेळी आठरे, दरे यांनीही विद्यार्थांना शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी रेसिडेंन्शिअलचे प्राचार्य विजयकुमार पोकळे यांनी संस्थेचा वाढत्या शैक्षणिक उच्चांकाचा आढावा सादर केला. विद्यालयाने शिष्यवृत्ती परिक्षेत राज्यात तृतीय, तर जिल्ह्यात प्रथम आलेल्या विद्यार्थांचे व त्यांच्या शिक्षकांचे आणि पालकांचे कौतुक केले. विद्यार्थांच्यावतीने यशराज मोरे याने तर पालकांच्यावतीने श्री.वाघ यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय म्हस्के यांनी तर अभार मृणाली ठुबे यांनी मानले.
रेसिडेंन्शिअल हायस्कूलचे शिष्यवृत्ती परिक्षेत जिल्ह्यात प्रथम तर राज्यात तृतीय क्रमांक मिळविला. या यशस्वी विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संस्थेचे उपाध्यश्र रामचंद्र दरे, सचिव जी. डी.खानदेशे, सहसचिव अॅड. विश्वासराव आठरे, विश्वस्त मुकेश मुळे, जयंत वाघ, प्राचार्य विजयकुमार पोकळे यांच्यासह शिक्षकवृंद व पालक उपस्थित होते.
COMMENTS