विजेत्या महिलांवर बक्षीसांचा वर्षाव: सरपंच मनिषाताई रोकडे यांचा पुढाकार सुपा | नगर सह्याद्री - पारनेर तालुयातील सुपा गावचे सरपंच मनिषाताई यो...
विजेत्या महिलांवर बक्षीसांचा वर्षाव: सरपंच मनिषाताई रोकडे यांचा पुढाकार
सुपा | नगर सह्याद्री-
पारनेर तालुयातील सुपा गावचे सरपंच मनिषाताई योगेश रोकडे व आईसाहेब सुमनताई संभाजी रोकडे आयोजित हळदी कुंकू व खेळ पैठनीचा या कार्यक्रमाला सुपा गावासह परीसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.गुरूवार दि. २६ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सुपा गावच्या सरपंच मनिषाताई योगेश रोकडे यांनी आयोजीत केलेला हळदी कुंकू व खेळ पैठणीचा हा कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला.
सुपा शहरात प्रथमच ग्रामपंचायत कार्यालयासमोर आयोजित हळदी कुंकू आणि खेळ पैठणीचा या कार्यक्रमाला लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम व भजन देखील कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासठी तितकेच महत्वाचे आणि मनोरंजक ठरले. खेळ पैठणीचा या कार्यक्रमाला सरपंच रोकडे यांनी प्रथम, द्वितीय, तृतीय असे आठ क्रमांकावर फ्रीज, टिव्ही, नथ व पैठणी, मिसर, गॅस शेगडी, कुलर, इस्त्री, फॅन महिलांसाठी रोज वापरात येणार्या वस्तू बक्षीस स्वरूपात ठेवण्यात आल्या होत्या.
पहिल्या आठ बक्षीसाचे मानकरी मनीषा आरखडे - फ्रिज व पैठणी, संगीता चव्हान - टिव्ही व पैठणी, प्रियंका श़िर्के - नथ व पैठणी, जयश्री पवार - कुलर, राणी मैड - गॅस शेगडी, दिपिका ढवळे - मिसर, आश्वीनी जवक - इस्री, मनिषा काळे - फॅन, यासह इतर दोन हजार महिलांना भेटवस्तुंचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख आर्कषन सिनेआभिनेत्री गौरी नलावडे हे होते. सुपा गावातील आणि परीसरातील महिलांनी या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणत हजेरी लावली. यावेळी प्रियंकाताई शिंदे पाटील, सुषमाताई गणेश शेळके, आश्वीनीताई थोरात, राहुल पाटील शिंदे, उपसरपंच दत्तात्रय पवार, उद्योजक योगेश रोकडे आदी यावेळी उपस्थित होते.
सरपंच रोकडे यांच्याकडून जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी
सुपा शहरातील महीलांसह ग्रामस्थांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा कचर्याचा प्रश्न सरपंच रोकडे यांनी मार्गी लावला. सरपंच रोकडे यांनी यापूर्वी महीलांसाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले आहेत. नुकतेच चार ते पाच दिवसांपूर्वी सरपंच रोकडे यांनी सुपा चौकात एका अनोळखी महीलेची रात्री १२ वाजता प्रसूती केली. व महीलेला खाजगी रूग्णालयात दाखल केले. सरपंच रोकडे यांचे महीलांविषयी असलेले प्रेम व जिव्हाळा निर्माण झाल्यामुळे या कार्यक्रमाची सुत्रे स्व:हा हाती घेतल्यानंतर या कार्यक्रमा निमित्त प्रथमच सुपा शहरामध्ये हजारोंच्या संख्येने महिला बघीणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या.
COMMENTS