भाळवणी | नगर सह्याद्री- मराठी चित्रपटसृष्टीत अत्यंत मानाचा समजल्या जाणार्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्पर्धात्मक विभागातील मराठ...
भाळवणी | नगर सह्याद्री-
मराठी चित्रपटसृष्टीत अत्यंत मानाचा समजल्या जाणार्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्पर्धात्मक विभागातील मराठी चित्रपटात मुळचे पारनेर तालुयातील भाळवणी येथे वैद्यकीय व्यवसाय करत असलेले व माळकूप गावचे रहिवाशी तसेच सध्या नगर येथे वास्तव्यास असलेल्या डॉ. सुरेश शिंदे अभिनीत, प्रसिद्ध सिने अभिनेते मिलिंद शिंदे, मंगेश बदर, मच्छिंद्र धुमाळ निर्मित व मंगेश बदर दिग्दर्शित ’मदार’ या चित्रपटाची निवड झाली आहे.
नगरचे नाव हिंदी-मराठी सिनेसृष्टीमध्ये सदाशिव अमरापुरकर यांच्या नंतर अजरामर करणारे सिने-नाट्य अभिनेते मिलिंद शिंदे यांच्याबरोबर अभिनय करण्याची संधी डॉ. सुरेश शिंदे यांना मिळाली आहे. पुणे फिल्म फाउंडेशन व महाराष्ट्र सरकार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या २१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्पर्धात्मक विभागातून एकूण सात चित्रपटांची निवड करण्यात आली असून त्यात ’मदार’ ची निवड झाली आहे. याबद्दलची यादी सोमवारी पुणे येथे झालेल्या पत्रकार परिषदेत फाउंडेशनचे अध्यक्ष व या महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी जाहीर केली. याप्रसंगी फिल्म फाउंडेशनचे सचिव रवी गुप्ता हे उपस्थित होते.
यावर्षी दि. २ ते ९ फेब्रुवारी दरम्यान पुणे येथे २१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून मुकुंदनगर येथील थिएटर अकादमी, सकल ललित कलाधर येथे दि. २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार असून समारोप दि. ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता होणार असल्याचे डॉ. जब्बार पटेल यांनी सांगितले
COMMENTS