सरस्वती हॉस्पिटल येथे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी अहमदनगर | नगर सह्याद्री भारतीय संस्कृती ही स्त्री शक्तीचा आदर करण्याची शिकवण देते. क्रा...
सरस्वती हॉस्पिटल येथे महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी
अहमदनगर | नगर सह्याद्री
भारतीय संस्कृती ही स्त्री शक्तीचा आदर करण्याची शिकवण देते. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचून महिलांना खर्या अर्थाने सामर्थ्यशील बनविण्याचे महान कार्य केले. आज सर्वच क्षेत्रात महिला ठसा उमटविताना दिसतात. महिलेने ठरवले तर तिच्यासाठी अशयप्राय असे काहीच नाही. वैद्यकीय क्षेत्रात डॉ. प्राजक्ता जाधव यांनी अतिशय प्रभावी काम चालवले आहे. आधुनिक तंत्रज्ञान व कौशल्याची जोड असल्याने सरस्वती हॉस्पिटल अनेक महिलांसाठी आरोग्य आधार बनले आहे, असे प्रतिपादन सारसनगर येथील माउंट लिट्रा झी स्कूलच्या मॅनेजिंग डायरेटर स्वाती मिलिंद कानडे यांनी केले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त माळीवाडा येथील सरस्वती हॉस्पिटलमध्ये महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी व माफक दरात शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी स्वाती कानडे बोलत होत्या. यावेळी नगरसेविका सुवर्णा जाधव, सावेरी सत्रे, हॉस्पिटलचे संचालक स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ.अमोल जाधव, डॉ.प्राजक्ता जाधव, समृध्दी यादव, कार्तिकी गांधी, शबाना सय्यद आदी उपस्थित होते.
डॉ.प्राजक्ता जाधव यांनी सांगितले की, आताच्या काळात लग्न झाल्यानंतर विविध कारणांनी दाम्पत्यांना मूलबाळ होत नाही. अशावेळी नैराश्य येते. मात्र आता आधुनिक आयव्हीएफ तंत्रज्ञान तसेच इतर उपचारांमुळे वंध्यत्व निराकरण करणे शय झाले आहे. यासाठी हॉस्पिटलमध्ये विशेष तपासणी व उपचार व्यवस्था उपलब्ध झाली आहे. आतापर्यंत अनेक विवाहित महिलांनी याचा लाभ घेत मातृत्व सुखाचा आनंद मिळवला आहे. या शिबिरातही वंधत्य निवारणाबाबत सविस्तर उपचार मार्गदर्शन केले जाणार आहे.
डॉ.अमोल जाधव यांनी सांगितले की, शिबिरांत मातृत्व काळातील उपचार व काळजी, रजोनिवृत्ती अर्थात मासिक पाळी जाण्याचा काळ तसेच स्त्री आरोग्याच्या अन्य समस्यांवर तपासणी व उपचार मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच आधुनिक लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया अत्यल्प दरात केल्या जाणार आहेत.
COMMENTS