महाराष्ट्रातील संकटग्रस्त साखर उद्योगाला मदत करण्यासाठी केंद्र लवकरच साखर निर्यातीचा कोटा वाढवण्यास परवानगी देणार आहे.
नवी दिल्ली / नगर सह्याद्री -
महाराष्ट्रातील संकटग्रस्त साखर उद्योगाला मदत करण्यासाठी केंद्र लवकरच साखर निर्यातीचा कोटा वाढवण्यास परवानगी देणार आहे. असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप नेत्यांच्या शिष्टमंडळाने शहा यांची भेट घेतली आणि उद्योगाशी संबंधित तक्रारींचे निराकरण करण्याची मागणी केली.
बैठकीनंतर फडणवीस म्हणाले,साखर निर्यात, खेळते भांडवल, मार्जिन मनी, कर्ज पुनर्गठन आणि इथेनॉल प्रकल्प उभारण्यासाठी लागणारा निधी याबाबतच्या तक्रारींचे निराकरण करण्याचे आश्वासन गृहमंत्री यांनी दिले आहे. आठवडाभरात आमच्या बाजूने निर्णय होऊ शकतो.
साखर निर्यातीचा कोटा वाढविण्याबाबत लवकर निर्णय घ्यावा लागेल, कारण एप्रिलपासून ब्राझीलची साखर आंतरराष्ट्रीय बाजारात उपलब्ध होणार आहे. यानंतर साखरेच्या दरात घट होण्याची शक्यता आहे. या बैठकीला भाजप नेते रावसाहेब पाटील दवे, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, धनंजय महाडिक आदी उपस्थित होते.
COMMENTS