मुंबई / नगर सहयाद्री - अंबरनाथ-उल्हासनगर रेल्वे स्थानकांदरम्यान लोकलमधून पडल्याची घटना घडली होती. जखमी झालेल्या तरुणीवर तब्बल १४ दिवस उपचार ...
मुंबई / नगर सहयाद्री -
अंबरनाथ-उल्हासनगर रेल्वे स्थानकांदरम्यान लोकलमधून पडल्याची घटना घडली होती. जखमी झालेल्या तरुणीवर तब्बल १४ दिवस उपचार सुरु होता. मात्र उपचाराला ही अपयश आल्याने तिचा मृत्यू झाला. वेळेत उपचार न मिळाल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचा आणि रेल्वे प्रशासनाने निष्काळजीपणा केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाने हे आरोप फेटाळले आहेत.
मिळालेल्या महितीनुसार, अंबरनाथजवळ लोकलमधून पडून जखमी झालेल्या दिव्या जाधव या तरुणीची १४ दिवसांपासून सुरू असलेली मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. १२ जानेवारीला संध्याकाळी दिव्या ही ब्युटी पार्लरच्या क्लासला जात होती. अंबरनाथ-उल्हासनगर या रेल्वे स्थानकांदरम्यान ती धावत्या लोकलमधून पडली. यात ती गंभीर जखमी झाली होती.
अंबरनाथमध्ये लोकलमधून पडून कॉलेज तरुणी जखमी, ॲम्बुलन्स वेळेत न आल्यामुळे तरुणी ४० मिनिटं प्लॅटफॉर्मवरच, तिथे ॲम्बुलन्स वेळेत आली नाही. तसेच मेडिकलचा मेमो लवकर न दिल्यामुळे ती ४५ मिनिटे उपचारांअभावी फलाटावरच होती. यानंतर तिला आधी उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात नेण्यात आले. त्यानंतर तिथून एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले.
अपघातात जखमी झालेली आमची मुलगी ४५ मिनिटे रेल्वेच्या फलाटावरच पडून होती. तिला वेळेत उपचार मिळाले असते तर आमची मुलगी नक्की वाचली असती, असे दिव्याच्या वडिलांचे म्हणणे आहे.
मात्र उपचारांचा खर्च कुटुंबीयांच्या आवाक्याबाहेरचा असल्यामुळे तिला मुंबईच्या जे. जे. हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. तिथे १० दिवस तिच्यावर उपचार सुरू होते. पण आज सकाळच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबीयांनी रेल्वे प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.
संपूर्ण प्रकाराबाबत अंबरनाथ रेल्वे स्थानकाचे स्थानक प्रबंधक रामेश्वर प्रसाद मीना यांनी सांगितले की, दिव्याच्या उपचारात कोणतीही दिरंगाई झाली नाही. आम्हाला माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि रेल्वे कर्मचारी अपघाताच्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी लोकलने जखमी अवस्थेतील दिव्याला अंबरनाथ रेल्वे स्थानकात आणले.
COMMENTS