सोलापूर / नगर सहयाद्री- पैलवान डोपिंगच्या मोहात? कुस्ती जिंकण्यासाठी इंजेक्शन्सचा वापर? महाराष्ट्र केसरीतही डोपिंगची कीड? हे प्रश्न विचारण्य...
सोलापूर / नगर सहयाद्री-
पैलवान डोपिंगच्या मोहात? कुस्ती जिंकण्यासाठी इंजेक्शन्सचा वापर? महाराष्ट्र केसरीतही डोपिंगची कीड? हे प्रश्न विचारण्याचं कारण आहे. सोलापुरात झालेली कारवाई.. महाराष्ट्र केसरी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. अशातच सोलापुरच्या अन्न आणि औषध प्रशासनाने माळशिरस तालुक्यातील तीन औषध विक्रेत्यांवर कारवाई केलीय. सोलापुरात अन्न आणि औषध प्रशासनाने एक मोठी कारवाई केलीय.
मेफेन टरमाईन या औषधाची अवैधपणे विक्री केल्याने माळशिरस तालुक्यातील तीन औषधविक्रेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यांचे परवाने रद्द करण्यात आले. या कारवाईमुळे महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या कुस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातायत. हे विना डॅाक्टर परवानगी विकलेले मेफेन टरमाईन हे पैलवानांना विकल्याचं समोर येतेय. महाराष्ट्र केसरी अवघ्या काही दिवसांवर असताना झालेली ही कारवाई पाहता कुस्तीतील डोपिंगची कीड महाराष्टॅ केसरी पर्यंत पोहोचली काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय.
कारवाईत पुढे आलेलं मेफेन टरमाईनची किमंत ३०० रुपये आहे. पण, काही मेडिकल्समध्ये दीड हजार रुपयांना हे इंजेक्शन विकलं जातंय. दरम्यान पोलिसात दाखल झालेल्या एफआयआरनुसार..हे सर्व इंजेक्शन तालमीत कुस्ती करणाऱ्या पैलवानांना विकण्यात आले आहेत. त्यामुळे पैलवान डोपिंगच्या मोहात आहेत का? असा प्रश्न उपस्थित झालाय.
दीपक मेडिकल्स एन्ड जनरल स्टोअर्स - ७४०४ वायल्स
ओमसाई मेडिकल्स एन्ड जनरल स्टोअर्स - ५८३ वायल्स
राजलक्ष्मी मेडिकल्स एन्ड जनरल स्टोअर्स - १०७ वायल्स
सोलापुरच्या अन्न आणि औषध प्रशसनाने 5 डिसेंबर 2022 माळशिरस तालुक्यातील या तीन ही मेडिकल्सची तपासणी केली. अवैध पद्धतीने मेफेन टरमाईन विकल्याने या औषध विक्रेत्यांना खुलासा सादर करण्याच्या नोटीस देण्यात आल्या. विक्रेत्यांकडून आलेला खुलासा असमाधानकारक असल्याने 21 डिसेंबर 2022 रोजी कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. त्यानंतर 30 डिसेंबर 2022 रोजी या तीन ही मेडिकलचा परवाना रद्द करण्यात आला.
COMMENTS