मुंबई । नगर सह्याद्री बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सध्या त्यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. दो...
मुंबई । नगर सह्याद्री
बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सध्या त्यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. दोघेही त्यांच्या लग्नाच्या तयारीत लागल्याचे म्हटले जात आहे. पुढच्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीमध्ये ते दोघे लग्न बंधनात अडकणार असल्याचे एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे. या सगळ्यात कियाराचा एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. मात्र, कियाराचा हा व्हिडीओ तिच्या लग्नाच्या तयारीतील नाही तर तिच्या चुलत बहिणीच्या लग्नाचा आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. कियाराचा हा ड्रेस कट-आउट परिधान करत आहे. तिचा हा स्लिट ड्रेस अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. कियाराच्या जबरदस्त अशा डान्स मुव्ह्जनं चाहत्यांना वेड लावले आहे. कियाराच्या या व्हिडीओवर नेटकर्यांनी कमेंट करत त्यांना तिचा डान्स आवडल्याचे सांगितले आहे. एका नेटकर्यानं कमेंट करत लिहिले की, तू खर्या आयुष्यातही खूप सुंदर आहेस. कियारा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते.
दरम्यान, कियारा लवकरच कार्तिक आर्यनसोबत ’सत्य प्रेम की कथा’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणसोबत ’आरसी 15’ या चित्रपटातही दिसणार आहे. वरुण धवनसोबतचा ’मिस्टर लेले’ आणि सिद्धार्थ मल्होत्रासोबतचा ’अदल बादल’ हे चित्रपटही कियाराकडे आहेत. सिद्धार्थ आणि कियारा 6 फेब्रुवारी रोजी लग्न बंधनात अडकणार आहेत. तर त्यांच्या लग्नाच्या आधीचे कार्यक्रम हे 4 आणि 5 फेब्रुवारी रोजी होणार आहेत. सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नात फक्त त्या दोघांचं कुटुंब आणि जवळचे मित्र हजेरी लावणार आहेत. सिद्धार्थ आणि कियारानं कतरिना आणि विकीप्रमाणे लग्नासाठी रॉयल पॅलेसची निवड केली आहे.
COMMENTS