पारनेर । नगर सह्याद्री- आमदार नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे यंदाही 2 ते 5 फेब्रुवारी दरम्यान बाजार समिती आवार परिसरात राज्यस...
पारनेर । नगर सह्याद्री-
आमदार नीलेश लंके यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे यंदाही 2 ते 5 फेब्रुवारी दरम्यान बाजार समिती आवार परिसरात राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. सोमवारी या प्रदर्शनाच्या स्टॉल उभारणीचा शुभारंभ करण्यात आला आहे. शेतकर्यांना शेतीमालाचे तंत्रज्ञान अवगत व विकसित करण्यासाठी, आधुनिक पीक पद्धतीची माहिती व आधुनिक तंत्रज्ञानाची जोड या प्रदर्शनाच्या माध्यमातून देण्यासाठी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले जात असल्याचे आमदार नीलेश लंके व सचिव कारभारी पोटघन मेजर यांनी सांगितले.
गुरूवार दि. 2 फेब्रुवारी रोजी या प्रदर्शनाचे उदघाटन राज्याचे माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते तर राज्याच्या आदर्शगांव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्श्री डॉ. पोपटराव पवार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, आ. नीलेश लंके यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.
यावेळी अर्बन बँकेचे अध्यक्ष अशोक शेठ कटारिया उद्योजक हसन राजे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. बाळासाहेब कावरे सरपंच सचिन पठारे रा. या. औटी नगरसेवक डॉ. सचिन औटी डॉ सादिक राजे बाळासाहेब नगरे लहुशेठ बुचडे चंद्रकांत ठुबे जितेश सरडे विजय औटी, सुभाष शिंदे, योगेश मते, भुषण शेलार अमित जाधव, बाळासाहेब नगरे भाऊ साठे नंदकुमार देशमुख अमोल यादव अक्षय चेडे, सलीम राजे, वैभव गायकवाड, रमीज राजे, संदीप पवार, सचिन साठे, जगदीश गागरे, संपत वाळुंज, बन्सी आरोटे आदी उपस्थित होते.
गाय, बैल, अश्व, बोलका पोपट, श्वान हे आकर्षण
पारनेरमधील कृषी उत्पन्न बाजार समितीलगतच्या प्रांगणात सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेदरम्यान पार पडणार्या या प्रदर्शनात पशु पक्षी प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात येणार असून त्याचे गाय, बैल, अश्व, बोलका पोपट, श्वान हे आकर्षण असणार आहे. खाऊ गल्ल्लीमध्ये कोकण, मराठवाडा, कोल्हापूर, सांगली येथील प्रसिध्द असलेल्या विविध खाद्य पदार्थांची मेजवाणी या प्रदर्शनाच्या निमित्ताने मिळणार असून महिलांसाठी नव-नवीन गृहउपयोगी वस्तूंचे स्टॉलही खास आकर्षण असणार आहे. लहान मुलांसाठी स्वतंत्र किडस् झोनची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सचिव कारभारी पोटघन मेजर यांनी सांगितले.
’विचार छत्रपतींचा सन्मान बळीराजांचा’ ही टॅगलाईन घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात कृषी तंत्रज्ञान, खते, कुकुट पालन, बँक अर्थ सहकार्य, सोलर, सिंचन, हरितगृह, शेती मार्गदर्शन, शेती औजारे, बी-बीयाणे, शासकीय योजना, महिला उद्योगविषयक माहिती, नव नवीन ट्रॅक्टर, डेअरी तंत्रज्ञान, महिला बचत गट, शेती विषयक सर्व माहीती, आरोग्य विषयी जनजागृती, मुला मुलींसाठी शाळा कॉलेज तसेच कॉम्प्युटर विषयी माहितीचा समावेश करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात सहभागी होऊ इच्छिणा र्या स्टॉलधारकांनी 7558394043, 7666805269, 9637943333, 8698733668 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
COMMENTS