मुंबई / नगर सह्याद्रि- राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर काल ईडीने छापेमारी केली. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आ...
मुंबई / नगर सह्याद्रि-
राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर काल ईडीने छापेमारी केली. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता मुश्रीफ यांना ललकारले आहे. मी कोल्हापूरच्या दौऱ्यावर येणार आहे. कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं मी दर्शन घेणार आहे. माझं चॅलेंज आहे. रोखायचं असेल तर रोखून दाखवा, असं आव्हानच किरीट सोमय्या यांनी मुश्रीफ यांना दिलं आहे.
हसन मुश्रीफ यांच्या जावयाची कंपनी कधी जन्माला आली? 1500 कोटींच्या कामाचे वर्क ऑर्डर आपण दिलेलं होतं. जावयाला पैसे द्यावे लागणार असे आदेश हसन मुश्रीफ यांनी काढले होते. मुश्रीफ यांचे सेक्रेटरी या घोटाळ्यात सामील आहेत. त्यांची देखील चौकशी होणार आहे.
कोल्हापूरला सर्वप्रथम आई लक्ष्मी मातेचे दर्शन घेण्यासाठी जात आहे. त्यामुळे मी मुश्रीफ यांना चॅलेंज करतो, त्यांनी आता मला रोखूनच दाखवावे. मागच्या वेळी माफिया सरकार होतं. त्यामुळे मला रोखलं गेलं होतं. आता मला तुम्ही रोखू शकत नाही. मी येत आहे. मुश्रीफ यांनी मला थांबवून दाखवावेच, असं आव्हानच किरीट सोमय्या यांनी दिलं आहे.
छोट्या कंपनीला 1500 कोटींचे टेंडर दिले आहे. ते कसे दिले? आता कारवाई सुरू आहे. सगळे पेपर, डॉक्युमेंट समोर आहेत. या संबंधित आता कारवाई होणार आहे. मी मुस्लिम आहे म्हणून माझ्यावर कारवाई होत असल्याचं ते सांगतात. गोरगरीबांना लुटताना त्यांना धर्म आठवला नव्हता का? असा सवाल त्यांनी केला. मुश्रीफ यांनी आता कोर्टासमोरच सर्व काही मांडावं, अशी मागणीही त्यांनी केली.
COMMENTS