कोलकत्ता : पश्चिम बंगालमधील पूर्व बर्धमान जिल्ह्यात रविवारी भरघाव वेगाने येणारी बस अचानक उलटली. त्यामध्ये एकाचा मृत्यू तर ४५ जण जखमी झाले आह...
कोलकत्ता : पश्चिम बंगालमधील पूर्व बर्धमान जिल्ह्यात रविवारी भरघाव वेगाने येणारी बस अचानक उलटली. त्यामध्ये एकाचा मृत्यू तर ४५ जण जखमी झाले आहेत. यातील काही जणांना गंभीर दुखापत झाली आहे. बसच्या पुढे एक रुग्णवाहिका जात होती. बस रोडच्या खाली उतरुन अचानक उलटती. बस उलटल्यानंतर बसच्या वरती बसलेले प्रवाशी खाली दबले गेले. हा अपघात झाल्यावर परिसरातील लोक तत्काळ मदतीसाठी आले. पोलिसांच्या माहितीनुसा कटवा-बीरभूम राज्य महामार्गावर हा अपघात झाला. तीघांची प्रकृती गंभीर जखमी आहे. त्यांच्यावर कटवा येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्त ध्रुबो दास म्हणाले, चालकाला अटक केली असून, बस ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बस रोडवरती चालण्यासाठी पात्र होती का? याचा तपास पोलीस करत आहेत.
COMMENTS