मुंबई । नगर सह्याद्री - संजय राऊत यांना आपण पुन्हा जेलवारी घडवणार असल्याचा घणाघात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. राणेंनी केलेल...
संजय राऊत यांना आपण पुन्हा जेलवारी घडवणार असल्याचा घणाघात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. राणेंनी केलेल्या हल्ल्यानंतर संजय राऊत यांनी देखील ‘माझ्या नादाला लागू नका. झाकली मुठ सव्वा लाखाची’, असे म्हणत पलटवार केला.
नारायण राणे म्हणाले, नारायण राणेवर बोलले की पत्रकारांची ब्रेकिंग न्यूज होते. याचमुळे मुखपत्राचे कात्रण मी जपून ठेवले आहे. ते मी वकीलाकडे पाठवले आहे. मी वाचून विसरणारा नाही, दखल घेणारा आहे. माझा स्वभाव वाईट असल्याचा टोला राणे यांनी संजय राऊतांना लगावला. २६ डिसेंबरचा अग्रलेख मी राखून ठेवलाय. त्यातील प्रत्येक वाय न वाय मी लक्षात ठेवले आहे. संजय राऊत यांना मी सोडणार नाही. त्याच्यावर लवकरच केस दाखल करणार. संजय राऊतने १०० दिवस तुरुंगात घालवले. ते कमी पडलेत.
संजय राऊत नारायण राणे यांच्यावर पलटवार करताना म्हणाले, यांच्यासारखे डरपोक आणि पळपुटे ईडीची नोटीस येताच पक्ष बदलणारे आम्ही नाही. मी अजूनपर्यंत त्यांच्यावर काहीच बोललेलो नाही. माझ्या नादाला लागू नका. झाकली मुठ सव्वा लाखाची, असू द्या. हे काय मला जेलमध्ये टाकतील. माझ्या पक्षासाठी मी हिंमतीने जेलमध्ये गेलोय. आम्ही नामर्द नाही, बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. तुम्ही कायद्याचे बाप झालात का? कोणकोण मला जेलमध्ये टाकण्याची धमकी देत आहे याची नोंद मी ठेवली आहे.
COMMENTS