मुंबई - सुपरहिट कन्नड चित्रपट कांतारा’चा अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टीने पुन्हा एकदा अभिनेत्री रश्मिका मंदानावर निशाणा साधला आहे. ऋषभच्...
मुंबई -
सुपरहिट कन्नड चित्रपट कांतारा’चा अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टीने पुन्हा एकदा अभिनेत्री रश्मिका मंदानावर निशाणा साधला आहे. ऋषभच्या आगामी चित्रपटात रश्मिकाला भूमिका देणार का, या प्रश्नावर त्याने मजेशीर प्रतिक्रिया दिली. रश्मिका ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
टॉलिवूडमध्ये सुपरहिट चित्रपट केल्यानंतर तिने नुकताच बॉलिवूडकडे मोर्चा वळविला आहे. मात्र रश्मिकाविषयी कन्नड चित्रपटसृष्टीत बरीच नाराजी पहायला मिळते. ‘पुष्पा’ फेम अभिनेत्री रश्मिकाने काही दिवसांपूर्वी केलेल्या एका टिप्पणीमुळे नेटकरी तिच्यावर नाराज झाले. यावेळी रश्मिकाला लाँच करणार्या परमवाह स्टुडिओजचं नाव घेण्याचं ती टाळत होती. रश्मिकाच्या या वागणुकीने तिला कन्नड फिल्म इंडस्ट्रीतून नाराजीचा सामना करावा लागतो. नाराजी नाट्यानंतर रश्मिकाने म्हटलं होतं, मी कन्नड इंडस्ट्री आणि त्यांच्या प्रेक्षकांवर खूप प्रेम करते. बाकी त्यांची मर्जी. तिच्या या वक्तव्यानंतर हा वाद शमला होता.
मात्र पुन्हा एकदा ऋषभच्या प्रतिक्रियेनंतर रश्मिकाची चर्चा होऊ लागली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ऋषभला विचारण्यात आलं की तो त्याच्या आगामी चित्रपटात रश्मिकासोबत काम करणार का? यावर उपरोधिक उत्तर देत तो म्हणाला, रश्मिकाने आधीच मला खूप चांगली प्रतिक्रिया दिली आहे.
आता त्यानंतर तुम्ही माझ्याकडून काय अपेक्षा ठेवाल? ऋषभच्या या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियावर नेटकर्यांकडून मीम्सचा वर्षाव होत आहे रश्मिकाच्या प्रवासाबद्दल ऋषभ म्हणाला, तिने खूप संघर्ष केला आहे आणि तिच्या संघर्षाचं कौतुक मी करतो. मी खुश आहे की तिच्या यशात माझंही थोडं योगदान आहे. ऋषभच्या किरिक पार्टी’ या चित्रपटातून रश्मिकाला इंडस्ट्रीत लाँच करण्यात आलं होतं.
COMMENTS