पारनेर | नगर सह्याद्री तालुक्यातील कान्हूर पठार येथील रयत शिक्षण संस्थेच्या जनता विद्या मंदिर मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साज...
तालुक्यातील कान्हूर पठार येथील रयत शिक्षण संस्थेच्या जनता विद्या मंदिर मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.
स्त्रियांच्या अंधार्या जीवनात पेटवल्या ज्ञानाची ज्योती म्हणून तर आज जगती आहे. सावित्री अशा या पहिल्या स्त्री शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मंगळवारी विद्यालयामध्ये सहावी क च्या विद्यार्थ्यांनी नियोजन करून कार्यक्रमामधून साजरी केली. प्रथम फापळे श्रुती हिने कार्यक्रमाच्या अध्यक्षा शिल्पा लोंढे यांची निवड करून वेदिका वाळूंज हिने अनुमोदन देऊन कर्यक्रमास सुरुवात केली. सर्व मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. विद्यार्थी मनोगतामध्ये शेळके तनुजा, मते श्रेया, फापळे श्रुती, ठुबे कस्तुरी, वाळूंज वेदिका, भालेकर नम्रता, भागवत सानिया, वाळूंज वेदांती, ठुबे समृद्धी, झावरे आरती, झावरे सई सर्व विद्यार्थ्यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची संघर्षमय कहानी विद्यार्थ्यांसमोर मांडली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन इयत्ता दहावी ब मधील विद्यार्थिनी भागवत तन्वी ही प्रेरणा गीत सादर केले. शिक्षक मनोगत मध्ये ओम प्रकाश देंडगे, नागरगोजे सर, प्राचार्य बाबासाहेब वमने यांनी विद्यार्थ्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या संघर्ष व या संघर्षास साथ दिलेले महात्मा फुले यांची जीवनगाथा विद्यार्थ्यांसमोर मांडली. कार्यक्रमाचे अध्यक्ष शिल्पा लोंढे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती दिली. कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक जयसिंग, ठुबे राघू, महेश कुमार साबळे, लक्ष्मण धोत्रे, सांस्कृतिक विभाग प्रमुख सुहास गोरडे उपस्थित होते. सूत्रसंचलन कस्तुरी ठुबे हिने केले तर आभार ठुबे वेदिका हिने मानले.
COMMENTS