मुंबई - शाहरुख खानच्या ’पठान’ चित्रपटाचा फिव्हर चाहत्यांसह बॉलिवूड स्टार्समध्ये देखील पाहायला मिळत आहे. सर्वजण शाहरुखच्या दमदार अॅशन आणि चि...
मुंबई -
शाहरुख खानच्या ’पठान’ चित्रपटाचा फिव्हर चाहत्यांसह बॉलिवूड स्टार्समध्ये देखील पाहायला मिळत आहे. सर्वजण शाहरुखच्या दमदार अॅशन आणि चित्रपटाच्या कथेचे कौतुक करत आहेत. चित्रपट निर्माता करण जोहरने ’पठान’च्या रेकॉर्डब्रेक बॉस ऑफिस कलेशनवर प्रतिक्रिया देत सांगितले की ’प्रेम नेहमी द्वेषावर मात करते.’ सोबतच आता कंगनानेही ’पठान’ चित्रपटावर आपले मत स्पष्ट केले. सध्या चित्रपटाने बॉयकॉट आणि विरोधाचा सामना केल्यानंतर’बेशरम रंग’ गाण्यामुळे चित्रपटगृहात चित्रपट चांगलाच चालत आहे.
नुकतेच बुधवारी कंगनाने ’पठाणसारखे चित्रपट नक्कीच चालले पाहिजे’ असे म्हटल्यानंतर कंगनाने आता यू-टर्न घेतला आहे. कारण चित्रपटात शत्रू देश असलेल्या पाकिस्तानाला चांगल्या प्रकारे दाखवण्यात आले आहे. अलीकडेच कंगना ट्वीटरवर पुन्हा एकदा जोमात परतली आहे, पठानला विरोध करणं हाच त्याचा मोठा विजय असल्याचा दावा करणार्यांना संबोधित केले. पठान बद्दल भारताचे प्रेम आणि सर्वसमावेशकता चित्रपट थिएटरमध्ये यशस्वीपणे चालू आहे.
नुकतेच केलेल्या ट्वीटमध्ये कंगना म्हणते, ’पठानच्या विरोधावर प्रेमाचा विजय असल्याचा दावा करणार्यांशी मी सहमत आहे, पण कोणाच्या द्वेषावर कोणाचे प्रेम? ८० टक्के हिंदू राहतात आणि तरीही आपला शत्रू देश पाकिस्तान आणि खडखड यांना प्रकाशझोतात आणणारा ’पठान’ चित्रपट बॉस ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. द्वेष आणि निर्णयाच्या पलीकडे असलेली ही भारताची भावना, त्याला महान बनवते. भारताच्या प्रेमानेच शत्रूंच्या द्वेष आणि विचित्र राजकारणावर विजय मिळवला आहे. पण आशा ठेवणार्यांनी कृपया लक्षात घ्या... पठाण हा फक्त एक चित्रपट असू शकतो... ’गुंजेगा तो यहाँ सिर्फ जय श्री राम... जय श्री राम.”
COMMENTS