भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य विश्वनाथ कोरडे यांच्या पाठपुरावाला यश पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुयातील कडूस येथील नळ पाणीपुरवठा ...
भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य विश्वनाथ कोरडे यांच्या पाठपुरावाला यश
पारनेर तालुयातील कडूस येथील नळ पाणीपुरवठा योजने चे काम तातडीने सुरू व्हावे अशी माजी जिल्हा परिषद सदस्य व भाजपच्या राज्य कार्यकारिणीचे सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद अहमदनगर यांच्याकडे मागणी केली होती. त्या अनुषंगाने कार्यकारी अभियंता यांनी २ जानेवारी रोजी संबंधित अधिकारी ठेकेदार व सरपंच व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन केले. त्या बैठकीत संबंधित कॉन्ट्रॅटर संजय रोकडे यांना दोन महिन्यात संबंधित योजनेचे काम पूर्ण करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर दुसरीकडे संबंधित अधिकारी ठेकेदाराला पाठिशी घालु असून पाणी पुरवठा उप अभियंतावर कारवाईची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
कडूस पाणीपुरवठा योजनेचे काम अनेक दिवसांपासून रखडले यासंदर्भात भाजपचे राज्य कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी लक्ष घालून संबंधित कार्यकारी अभियंता यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. योजना सुरू होण्यासाठी संबंधित विभागांना पत्र व्यवहार केला. त्यानुसार कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात संबंधित योजनेच्या कंत्राटदार यांच्यावतीने प्रतिनिधी सुदाम कोरडे उपयभियंता तसेच ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत योजनेच्या कामा बाबत च्या अडीअडचणी बाबत विस्तृत चर्चा होऊन सदर योजना पुढील दोन महिन्यात तातडीने पूर्ण करून देण्याचे आश्वासन संबंधित कंत्रादराने दिले. सदरचे काम संबंधित कंत्राटदाराकडून अभियंता उपविभाग पारनेर यांनी तातडीने पूर्ण करून घेण्याच्या सूचना कार्यकारी अभियंता यांनी दिले आहेत. तसे पत्र संबंधित विभागाने विश्वनाथ कोरडे यांना दिले आहे. त्यामुळे अनेक वर्षापासून रखडलेली ही योजना पुन्हा सुरळीत सुरू होईल व काम पूर्णत्वास जाईल असा विश्वास विश्वनाथ कोरडे यांनी व्यक्त केला आहे.
ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे योजना रखडली
कडूस पाणीपुरवठा योजना ही शासनाकडून मंजूर झाली होती. संबंधित ठेकेदाराला त्याचे काम देण्यात आले होते. परंतु ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे गेल्या चार वर्षापासून ही योजना बंद होती. ठेकेदार वारंवार कारणे पुढे करीत असल्याने ही योजना वेळेत पूर्ण होऊ शकली नाही. परंतु आता संबंधित विभागाने व ठेकेदाराने दोन महिन्यात ही योजना पूर्ण करू अशी आश्वासन दिले आहे.
- विश्वनाथ कोरडे, सदस्य भाजपा राज्य कार्यकारिणी
COMMENTS