हरित व सुंदर केडगावचे स्वप्न साकारण्यासाठी ‘एक वृक्ष एक मित्र’ मोहिमेला प्रारंभ अहमदनगर । नगर सह्याद्री भावी पिढीच्या भवितव्यासाठी आपल्या म...
हरित व सुंदर केडगावचे स्वप्न साकारण्यासाठी ‘एक वृक्ष एक मित्र’ मोहिमेला प्रारंभ
अहमदनगर । नगर सह्याद्री
भावी पिढीच्या भवितव्यासाठी आपल्या मुलाप्रमाणे झाडे लावून ती वाढवण्याची गरज आहे. निसर्ग संवर्धनासाठी प्रत्येकाच्या अंगणात झाडे फुलले पाहिजे. समाजसेवेला वृक्षरोपणाची जोड मिळाल्यास पर्यावरण संवर्धन होणार आहे. केडगावचा विकास साधण्यासाठी राजकारण बाजूला ठेऊन समाजसेवा या ध्येयाने प्रत्येकाने वाटचाल करावी. केडगावच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन योगदान दिल्यास हरित व सुंदर केडगावचे स्वप्न साकारले जाणार असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा सचिन जगताप यांनी केले.
केडगाव येथील मोहिनी नगर परिसरात वृक्षारोपण अभियान राबवून लावलेली झाडे जगविण्यासाठी ठिबक सिंचनने पाणी देण्याच्या पाईपलाइन प्रणालीचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी सुवर्णा जगताप बोलत होत्या. नगरसेविका तथा महिला व बालकल्याणच्या माजी सभापती लताताई शेळके यांच्या संकल्पनेतून एक वृक्ष एक मित्र उपक्रमातंर्गत हा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी एक वृक्ष एक मित्र समितीचे कार्यवाह बाबासाहेब वायकर, सामाजिक कार्यकर्ते पै. सुरज शेळके, नगरसेविका गौरीताई ननावरे, नगरसेवक राहुल कांबळे, उद्योजक गणेश ननावरे, युवा कार्यकर्ते सोनू घेंबुड, माजी संचालक भैरूशेठ उर्फ श्याम कोतकर, महेश सरोदे, सचिन सरोदे, बचत गटाच्या अध्यक्षा कदम ताई, कोमल वायकर, नाथाभाऊ कोतकर, नवनाथ कोतकर, बाळासाहेब उर्फ बच्चन कोतकर, भरत भंडारी, इंजि. उमेश ठोंबरे, इंजि. शुभम नलवडे आदींसह परिसरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुवर्णा जगताप म्हणाल्या की, केडगावमध्ये राबविण्यात आलेला वृक्षरोपण व संवर्धनाचा उपक्रम कौतुकास्पद आहे. माजी महापौर संदीप कोतकर यांना वृक्षरोपणाचा मोठा छंद आहे. विविध झाडे त्यांनी वाढवली आहे. त्यांच्या प्रेरणेने केडगावकर भविष्यातील वाटचाल करत आहे. प्रास्ताविक महिला व बालकल्याणच्या माजी सभापती लताताई शेळके यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत पै. सुरज शेळके यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सारिका सूर्यवंशी, कोमल बनसोडे, सौ. बलदोटा, सिंधू इबीतदार, मंदाताई कुलधर, विमल ठोंबरे, वंदना भोसले, अकोलकर, ढगे, बोरुडे, बडे, दराडे, बोडखे, भापकर, शुभांगी वाडगे, दहिफळे, रणसिंग, बोरकर ताई, घोडके, नन्नवरे, गुरव, पिरजादे यांनी परिश्रम घेतले.
COMMENTS