मुंबई / नगर सहयाद्री- शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या कारला भीषण अपघात झाला. पोलादपूर तालुक्यातील चोळई गावच्या हद्दीत हा अपघात झाला. या ...
मुंबई / नगर सहयाद्री-
शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या कारला भीषण अपघात झाला. पोलादपूर तालुक्यातील चोळई गावच्या हद्दीत हा अपघात झाला. या अपघातात तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत.
मुंबईला जात असताना माझ्या गाडीचा अपघात झाला होता. रात्री १०.१५ च्या सुमारास कारला कशेडी घाटातील चोळई गावच्या हद्दीत अपघात झाला. कारच्या पुढे आणि पाठीमागे पोलीस वाहने असतानाही टँकरने धडक दिली.शुक्रवारी रात्री सव्वादहा वाजताच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे. मुंबईच्या दिशेने जाताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
अपघातानंतर आमदार योगेश कदम हे मुंबईला दुसऱ्या वाहनाने रवाना झाले. तर अपघातानंतर टँकरचा चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. आमदारांच्या कारला धडकल्यानंतर टँकर उलटला असल्याची प्राथमिक माहिती आहे.शिंदे गटातील शिवसैनिकांनी हा घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. या घटनेची चौकशी करण्याची मागणी त्यांच्याकडून केली जात आहे.
दरम्यान, या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. एकाच्या डोक्याला मार लागला आहे. तर दोन पोलीस कर्मचाऱ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यात आल्याची माहिती आहे.
COMMENTS