जितो महाट्रेड फेअर २०२३ साठी मंडप उभारणी कामाचा शुभारंभ अहमदनगर | नगर सह्याद्री मागील काही काळात नगर शहरात वेगाने बदल होत आहेत. पायाभूत सु...
जितो महाट्रेड फेअर २०२३ साठी मंडप उभारणी कामाचा शुभारंभ
अहमदनगर | नगर सह्याद्री
मागील काही काळात नगर शहरात वेगाने बदल होत आहेत. पायाभूत सुविधा निर्मितीबरोबरच विकासाला चालना दिली जात आहे. यात जितो सारख्या संघटना महाट्रेड फेअर आयोजित करून उद्योग, व्यवसायाला चालना देण्याचा अतिशय स्तुत्य उपक्रम राबवित आहे. तीन वर्षानंतर नगरमध्ये पुन्हा होणारा हा महाट्रेड फेअर नवनवीन संधी सर्वांना उपलब्ध करून देणारा ठरेल. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून येत्या काळात नगर खर्या अर्थाने महानगर झालेले दिसेल, असे प्रतिपादन आ.संग्राम जगताप यांनी केले.
जैन इंटरनॅशनल ट्रेड आर्गनायझेशन (जितो)च्या अहमदनगर शाखेच्यावतीने नगर शहरात दि.२५ ते २९ जानेवारी २०२३ या कालावधीत जितो महाट्रेड फेअर २०२३’ चे आयोजन करण्यात आले आहे. केडगाव इंडस्ट्रीयल इस्टेट समोरील प्रशस्त प्रांगणात होणार्या महाट्रेड फेअरच्या मंडप उभारणी कामाचा शुभारंभ व भूमीपूजन आ.जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक मनोज कोतकर, लताताई शेळके, जितो रेस्ट ऑफ महाराष्ट्रचे व्हाईस चेअरमन गौतम मुनोत, सेक्रेटरी तथा प्रोजेट चेअरमन अमित मुथा, सीएफईच्या राष्ट्रीय समन्वयक सुमंगला मुनोत, जितो अहमदनगरचे चेअरमन जवाहर मुथा, सेक्रेटरी आलोक मुनोत, खजिनदार सौरभ भंडारी, व्हाईस चेअरमन सुरेश कांकरिया, सुनील मुनोत, सागर मुनोत, सी.ए. रमेश फिरोदिया, ,सौरभ भंडारी, संजय गुगळे, लेडीज विंग चेअरमन मेघना मुनोत, युथ विंग चेअरमन गौतम मुथा, महेश मुथियान, प्रितेश दुगड, दिनेश ओस्तवाल, विजय गुगळे, किशोर मुनोत, प्रदीप नहार, प्रितेश लुंकड, मयुर बोरा, केतन मुनोत, सोनल चोपडा, जितेंद्र मुथा, पारस चुडीवाल, आनंद गांधी, सचिन कटारिया, प्रशांत बोगावत, संगिता मुथियान, सोनाली डुंगरवाल, वैशाली ओस्तवाल, श्रद्धा गांधी, वैशाली मुनोत, दीपिका नहार, पूजा बरलोटा, रोहित लुणिया, रितेश पटवा, दर्शन चोपडा, सिद्धार्थ मुनोत, तन्मय चोपडा, वैभव मुनोत, यश बरलोटा, आयुष मुथा, तन्मय बरलोटा, साहील ओस्तवाल, ऋषभ बोरा आदी उपस्थित होते.
उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की, रोजगार निर्मितीसाठी उद्योग, व्यवसाय महत्वाचे असतात. त्यादृष्टीने जितो अतिशय चांगले काम करीत आहे. युवा वर्गाला दिशा देणारे अनेक उपक्रम ते राबवित असतात. नगरच्या पर्यटनदृष्टया विकासासाठी त्यांनी ऐतिहासिक वस्तू संग्रहालयात जितो गॅलरी साकारली. आता नवीन वर्षात होणारा महाट्रेड फेअर नगरच्या विकासाला चालना देणारा ठरेल असा विश्वास आहे.
जवाहर मुथा यांनी सांगितले की, अहमदनगर खूप मोठ्या क्षमता असलेले व विकासाच्या मोठ्या संधी असलेले शहर आहे. जितोची संपूर्ण टिम अतिशय झोकून देत काम करीत असल्याने प्रत्येकाला उर्जा मिळते. यंदाचा महाट्रेड फेअरही दिशा देणारा ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अमित मुथा यांनी सांगितले की, महाट्रेड फेअरमध्ये कृषी, उत्पादने, आय.टी, टेलिकॉम, शिक्षण, ग्राहकोपयोगी उत्पादने, अपना बाजार, टोमोबाईल, बांधकाम साहित्य, रियल इस्टेट, अंतर्गत सजावट, लघु उद्योग, आधुनिक तंत्रज्ञान, महिलांसाठी घरगुती उद्योगाशी संबधित दालन संबंधित ३५० हून अधिक स्टॉल्स असणार आहेत. या महाट्रेडच्या माध्यमातून राज्यासह देशातील विविध क्षेत्रातील आस्थापना, कंपन्या, उत्पादक नगरमध्ये येणार आहेत.
COMMENTS