अहमदनगर / नगर सहयाद्री- जेडीयूचे माजी अध्यक्ष, बिहारच्या राजकारणातील वेगळी ओळख असणारे शरद यादव यांचे निधन झाले आहे. यादव यांनी वयाच्या ७५ व...
अहमदनगर / नगर सहयाद्री-
जेडीयूचे माजी अध्यक्ष, बिहारच्या राजकारणातील वेगळी ओळख असणारे शरद यादव यांचे निधन झाले आहे. यादव यांनी वयाच्या ७५ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. शरद यादव गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. काल रात्री त्यांना श्वास घेताना त्रास होत होता. त्यानंतर तातडीनं फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, काही तासांतच त्यांची प्राणज्योत मालवली.शरद यादव यांच्या जाण्याने सर्वांनाच दुःख झाले आहे.
COMMENTS