गेल्या २४ तासात भारतात १८८ कोरोना रुग्ण आढळले असून, ०३ जणांचा मृत्यू झाला आहे.
नवी दिल्ली / नगर सह्याद्री -
गेल्या २४ तासात भारतात १८८ कोरोना रुग्ण आढळले असून, कालच्या तुलनेत ही संख्या १३ रुग्णांनी कमी झाली आहे. राज्यातील एकूण संक्रमित लोकांची संख्या ४,४६,७९,३१९ वर पोहोचली आहे. तसेच, गेल्या २४ तासात केरळमध्ये ०३ मृत्यूची नोंद झाली असून, देशातील एकूण मृतांची संख्या ५,३०,७१० वर पोहोचली आहे. यात मृत्यूचे प्रमाण १.१९% आहे.
२४ तासांच्या कालावधीत कोविड-१९ चे २,५५४ सक्रिय रुग्ण आढळले आहेत. जे कालच्या संख्येपेक्षा १६ रुग्णांनी घट झाली आहे. एकूण संक्रमितांच्या तुलनेत हे प्रमाण ०.०१% आहे.
गेल्या २४ तासात कोरोनाचे २०१ रुग्ण बरे झाले असून, रुग्णांचा राष्ट्रीय बरा होण्याचा दर ९८.८१% झाला आहे. तर एकूण बरे झालेल्यांची संख्या ४,४१,४६,०५५ आहे.
कोविड-१९ साठी देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत लसींचे २२०,१२,३३,७६२ कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत.
COMMENTS