मुंबई । नगर सह्याद्री - सध्या अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी वाढली आहे. थंडीसह राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. या ढगाळ वाताव...
मुंबई । नगर सह्याद्री -
सध्या अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी वाढली आहे. थंडीसह राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. या ढगाळ वातावरणामुळे अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली जात आहे. राज्यातही गेल्या दोन दिवसांपासून थंडीच प्रमाण वाढले आहे. राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे. कधी थंडीचा कडाका तर कुठे ढगाळ वातावरण जाणवत आहे. रस्त्यात बहुतांश भागांमध्ये तापमान चांगलेच कमी झाले आहे. काडकाच्या थंडीमुळे ग्रामीण भागासह शहरातही शेकोट्या पेटायला सुरुवात झाली आहे.
पश्चिमी चक्रवातामुळे राज्यात थंडी वाढणार
पश्चिमी चक्रवातामुळे राज्यात येत्या काही दिवसात थंडीत वाढ होणार आहे. अफगाणिस्तानात पुन्हा दोन चक्रवात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर भारतात हिमवृष्टीसह पावसाची शक्यता असल्याने राज्यातही त्याचा परिणाम जाणवणार आहे. येत्या काही दिवसांत थंडीत वाढ होणार आहे. निफाडमध्ये आज १५.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली असून थंडीचा पारा पुढील काही दिवसांत घसरण्याची शक्यता आहे.
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या पाच सहा दिवसांपासून हवामानात बदल झाला असल्याने तापमानाच्या पारा घसरला आहे. नंदूरबार जिल्ह्यातील धडगाव, मोलगी, अक्कलकुवा या भागात ढगाळ वातावरण असून धुक्याची चादर पसरली आहे सपाटी भागात 11 अंश सेल्सियस पेक्षा कमी आहे.
बुलढाणा जिल्ह्यात वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाले आहे. काल दिवसभर वातावरणामध्ये गारवा पसरला होता, तर आज सकाळपासूनच धूक्याची मोठी चादर पसरली आहे.
लातूर शहरासह जिल्ह्यातील सर्वच भाग सकाळी दाट धुक्याने व्यापला होता. सकाळी तब्बल तीन तास उशिराने सूर्यदर्शन झाले आहे.
अहमदनगरमध्ये पसरली धुक्याची चादर
अहमदनगर शहर आणि परिसरात सकाळपासून जाड धुक्याची चादर पसरली आहे. धुक्यामुळे वातावरण आल्हाददायक झालं असलं तरी रस्त्यावरील वाहनांना मार्ग काढण्यास अडथळा निर्माण होत आहे याबरोबरच रब्बीतील गहू हरभरा या पिकांना धुक्यामुळे मोठा फटका बसणार आहे.
COMMENTS