पुणे / नगर सहयाद्री- पुण्यातील हडपसर येथील मोहसीन शेख हत्या प्रकरणात सत्र न्यायालयानं निकाल दिला आहे. या प्रकरणात हिंदू राष्ट्र सेनेचा धनंजय...
पुणे / नगर सहयाद्री-
पुण्यातील हडपसर येथील मोहसीन शेख हत्या प्रकरणात सत्र न्यायालयानं निकाल दिला आहे. या प्रकरणात हिंदू राष्ट्र सेनेचा धनंजय देसाई याच्यासह २० जणांनी सबळ पुराव्याअभावी न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे.
एका वृत्तसंस्थांच्या माहिती नुसार, छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे काही आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यामुळे २ जून २०१४ मध्ये हडपसरमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी हिंदू राष्ट्रसेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली होती.काही जणांनी मोहसीनला हटकलं आणि मारहाण केली होती. त्यात मोहसीनचा मृत्यू झाला होता.
पुण्यातील हडपसर परिसरातील मोहसीन शेख हत्या प्रकरणात सत्र न्यायालयाने हिंदू राष्ट्रसेनेच्या धनंजय देसाईसह २० जणांची निर्दोष मुक्तता केली. सबळ पुराव्याअभावी ही मुक्तता करण्यात आली आहे.
सन २०१४ मध्ये आक्षेपार्ह पोस्टमुळे पुण्यात तणाव निर्माण झाला होता. त्यावेळी आयटी क्षेत्रातील अभियंता असलेला मोहसीन शेखची हत्या करण्यात आली होती.या प्रकरणी पोलिसांनी हिंदू राष्ट्रसेनेच्या धनंजय देसाईसह २३ जणांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते. सोलापुरातील काही तरुणांनी 'जस्टिस फॉर मोहसीन' ही चळवळ देखील सुरू केली होती.
COMMENTS