नांदेड / नगर सहयाद्री- नांदेडमध्ये काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यावर गोळीबार करण्यात आला. नांदेड शहरातील बाफना उड्डाणपुलावर रात्री ही घटना घ...
नांदेड / नगर सहयाद्री-
नांदेडमध्ये काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यावर गोळीबार करण्यात आला. नांदेड शहरातील बाफना उड्डाणपुलावर रात्री ही घटना घडली. यात सविता गायकवाड या जखमी झाल्या आहेत.
सविता गायकवाड या आपल्या स्कूटीवरुन रात्री मगनपुरा येथून आपल्या घरी जात होत्या. उड्डाणपुलावर एका दुचाकीवरुन आलेल्या तीन अज्ञातानी त्यांच्यावर गोळीबार केला. यात सविता गायकवाड यांच्या डावा दंडाला गोळी लागली. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सविता गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्यानंतर ते दुचाकीस्वार पसार झाले आहेत. यामुळे गोळीबार करणारे आरोपी कोण होते. त्यांनी हल्ला का केला? याचा तपास सुरू आहे.
COMMENTS