दक्षिण मुंबईतील गिरगाव येथे रविवारी रात्री एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा काही भाग कोसळून सात वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली.
मुंबई / नगर सह्याद्री -
दक्षिण मुंबईतील गिरगाव येथे रविवारी रात्री एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा काही भाग कोसळून सात वर्षांची मुलगी गंभीर जखमी झाली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, मुलीला रिलायन्स रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) दाखल करण्यात आले आहे. कृष्णा पटेल असे तिचे नाव असून, तिची प्रकृती चिंताजनक आहे.
नागरी आपत्ती नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, व्हीपी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इमारतीजवळ मुलगी उभी असताना हा प्रकार घडला. इमारत कोसळण्यामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनेनंतर स्थानिक पोलीस, मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी, स्थानिक बीएमसी वॉर्ड कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
COMMENTS