विमान उड्डाणाच्या तयारीत असताना आरोपीने एअर होस्टेससोबत गैरवर्तन केले. त्यानंतर त्याला आणि त्याच्या एका साथीदाराला विमानातून उतरवण्यात आले.
नवी दिल्ली / नगर सह्याद्री -
स्पाईसजेटच्या विमानात महिला केबिन क्रूचा विनयभंग केल्याप्रकरणी एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी ही घटना घडली असून विमान दिल्लीहून हैदराबादला जात होती. या घटनेची तक्रार विमान कंपनीचे सुरक्षा अधिकारी सुशांत श्रीवास्तव यांनी केबिन क्रूच्या वतीने दाखल केली आहे. पोलिसांनी सांगितले की त्यांना सोमवारी दुपारी ४.३९ वाजता पीसीआर कॉल आला, ज्यामध्ये स्पाइसेस फ्लाइट ८१३३ च्या प्रवाशाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली.
अबसार आलम असे आरोपी प्रवाशाचे नाव असून तो जामिया नगर, दिल्लीचा रहिवासी आहे. आरोपी आपल्या कुटुंबासह दिल्लीहून हैदराबादला जात होता. टेक ऑफ दरम्यान, आलमने क्रूच्या एका महिला सदस्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी सांगितले की, विमान उड्डाणाच्या तयारीत असताना आरोपीने एअर होस्टेससोबत गैरवर्तन केले. त्यानंतर त्याला आणि त्याच्या एका साथीदाराला विमानातून उतरवण्यात आले. इंदिरा गांधी विमानतळ पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध आयपीसी कलम ३५४ए अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
वृत्तानुसार, प्रवाशाने क्रू मेंबरला "अयोग्य पद्धतीने" स्पर्श केला होता. तर, फ्लाइटमध्ये कमी जागा असल्याने हा अपघात झाल्याचा दावा सहप्रवाशांनी केला. प्रवाशाने नंतर लेखी माफीनामा जारी केला, परंतु पुढील वाद टाळण्यासाठी त्याला उतरवण्यात आले.
#WATCH | "Unruly & inappropriate" behaviour by a passenger on the Delhi-Hyderabad SpiceJet flight at Delhi airport today
— ANI (@ANI) January 23, 2023
The passenger and & a co-passenger were deboarded and handed over to the security team at the airport pic.twitter.com/H090cPKjWV
COMMENTS