बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. कर्नाटकात एका संगीत समारोह दरम्यान गायक कैलाश खेर यांच्यावर हल्ला झाला आहे.
नवी दिल्ली / नगर सह्याद्री -
बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. कर्नाटकात एका संगीत समारोह दरम्यान गायक कैलाश खेर यांच्यावर हल्ला झाला आहे. कैलाश खेर स्टेजवर कार्यक्रम करत असताना दोन तरुणांनी त्यांना कन्नड गाणे म्हणण्यास सांगून पाण्याची बाटली फेकली
हल्ल्यानंतर गायक कैलाश खेर यांच्या प्रकृतीबाबत सध्या कोणतीही माहिती समोर आली नाही. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी तात्काळ कारवाई करत कैलास खेर यांच्यावर बाटली फेकणाऱ्या व्यक्तीला अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार, कैलाश खेर कर्नाटकातील हम्पी येथे आयोजित संगीत समारोहमध्ये सहभागी होण्यासाठी गेले होते.
COMMENTS