अहमदनगर | नगर सह्याद्री- जिल्ह्याचे सुपूत्र आणि पाथर्डी तालुयातील दुलेचांदगाव येथील रहिवाशी आणि पुणे ग्रामीणमधील हवेली उपविभागाचे पोलीस उपअ...
अहमदनगर | नगर सह्याद्री-
जिल्ह्याचे सुपूत्र आणि पाथर्डी तालुयातील दुलेचांदगाव येथील रहिवाशी आणि पुणे ग्रामीणमधील हवेली उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक भाऊसाहेब ढोले यांनी गेल्या तीन चार वर्षात पोलीस खात्यात केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे ते राष्ट्रपती शौर्य पदकासह विविध पदकाचे मानकरी ठरले आहेत.
गडचिरोली येथे त्यांनी नक्षलवाद्यांशी यशस्वी लढा देऊन अनेक नक्षलवादी यमसदनी धाडले.ढोले यांच्या नेतृत्वाखालील राबविलेल्या यशस्वी मोहिमेमुळे नक्षलवाद्यांची चळवळ थंडावली.या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सुरवातीस त्यांना २०२१ मध्ये सरकारने पोलिस महासंचालक पदक जाहीर केले. त्यानंतर २०२२मध्ये किस्नेली एन्काऊंटर मध्ये केलेल्या शौर्यापूर्न कामगिरीसाठी सरकारने ढोले यांना राष्ट्रपती शौर्य पदक जाहीर केले आहे.
याच कामगिरीबद्दल सरकारने त्यांना विशेष सेवा पदक ही गेल्या वर्षी जाहीर केले आहे. प्रजासत्ताकदिनीही ढोले यांना भारत सरकारने आणखी एक पदक म्हणजे आंतरिक सुरक्षा सेवा पदक जाहीर केले आहे.कमी कालावधीत केलेल्या या धडाकेबाज कामगिरीबद्दल ढोले यांचेवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
COMMENTS