मुंबई / नगर सहयाद्री- एका डॉक्टरांनी एक ट्वि्ट केलं आहे. ते ट्विट इतकं इमोशनल आहे की, लोकांनी कमेंट करुन कॅन्सरग्रस्त मुलाला आधार दिला आहे...
मुंबई / नगर सहयाद्री-
एका डॉक्टरांनी एक ट्वि्ट केलं आहे. ते ट्विट इतकं इमोशनल आहे की, लोकांनी कमेंट करुन कॅन्सरग्रस्त मुलाला आधार दिला आहे. एका मुलाला कॅन्सर झाल्याचं निदान झालं. ही गोष्ट माझ्या पालकांना सांगू नका असं त्या मुलाचं म्हणणं आहे. हे ऐकून डॉक्टर पुर्णपणे निशब्द झालेत. ही गोष्ट डॉक्टरांनी ट्विटच्या माध्यमातून लोकांच्यासमोर मांडली आहे.
डॉक्टरांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, सहा वर्षाच्या मुलाच्या आई-वडिलांनी डॉक्टारांना सांगितलं आहे की, त्याला सांगा तुझ्यावर उपचार करणार आहे. त्याचबरोबर आई-वडिलांनी हे सुध्दा सांगितलं आहे की, त्याला कॅन्सर झाल्याचं सागू नका असं डॉक्टरांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. कॅन्सरग्रस्त मुलाचं नाव मनू आहे. ज्यावेळी तो उपचारासाठी आला होता, त्यावेळी तो हसत होता. त्याच्यामधील आत्मविश्वास अधिक दिसत होता.
ज्या डॉक्टरांनी ही गोष्ट शेअर केली आहे, त्यांचं नाव सुधीर कुमार आहे. मनुला कॅन्सर झाला आहे. त्यामुळे मनुला त्याच्या आई-वडिलांची चिंता वाटत आहे. विशेष म्हणजे मनुने डॉक्टरांच्यासोबत खूपवेळ एकट्याने चर्चा केली. त्यावेळी त्याने डॉक्टरांना सांगितलं की, मी सहा महिने जिवंत असणार आहे, हे माझ्या आई-वडिलांना सांगू नका. ज्यावेळी डॉक्टरांशी बोलण्यासाठी मनू परवानगी मागितली त्यावेळी त्याच्या आई-वडिलांनी त्याला परवानगी सुध्दा दिली होती.
ज्यावेळी मनूला हा कॅन्सर झाल्याचं समजलं. त्यावेळी त्याने आयपॅडवरती त्या आजाराविषयी सगळी माहिती जाणून घेतली आहे. त्यामुळे त्याने डॉक्टरांना सांगितलं की, मी सहा महिने जिवंत राहणार आहे, हे माझ्या आई-वडिलांना सांगू नका.मनूने सांगितलेल्या गोष्टी ऐकून डॉक्टर एकदम निशब्द झाले होते. त्यानंतर डॉक्टरांनी मनूच्या आई-वडिलांना बोलावण्यात आलं, त्यावेळी मनूने डॉक्टरांना सांगितलेल्या सगळ्या गोष्टी डॉक्टरांनी मनू आई-वडिलांना सांगितल्या. त्यावेळी डॉक्टरसुध्दा भावूक झाले होते.
या घटनेला साधारण नऊ महिने पुर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे मनूचे आई-वडिल ज्यावेळी डॉक्टरांना भेटायला आहे. त्यावेळी डॉक्टर सुध्दा भावूक झाले होते. मनू एक महिन्यापूर्वीचं सगळ्यांना सोडून गेला होता. मनूच्या आई-वडिलांनी डॉक्टरांचे आभार मानले. कारण त्यांच्यामुळे मनूच्या आई-वडिलांनी मनूसोबत आठ महिने सुट्टी घेऊन आनंदात घालवले.
COMMENTS