मुबंई / नगर सहयाद्री वैद्यकीय क्षेत्रातून एक चिंताजनक बातमी समोर येत आहे.विविध मागण्यांसाठी मागील एका वर्षापासून मंत्र्यांसोबतच इतर प्रशासक...
मुबंई / नगर सहयाद्री
वैद्यकीय क्षेत्रातून एक चिंताजनक बातमी समोर येत आहे.विविध मागण्यांसाठी मागील एका वर्षापासून मंत्र्यांसोबतच इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठका होऊनही प्रतिसाद न दिल्याने रुग्णालयातील इमर्जन्सी सेवा वगळता इतर सेवा देताना काम बंद आंदोलन करत निवासी डॉक्टरांनी संप पुकारला आहे.
महाराष्ट्रातील निवासी डॉक्टरांच्या मध्यवर्ती मार्ड संघटनेकडून विविध समस्या आणि मागण्यांचे निवेदन वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आले आहे.काही दिवसांपूर्वी राज्यपाल, वैद्यकीय शिक्षण मंत्री, संबंधित विभागाचे सचिव,आयुक्त व संचालक यांच्यासोबत मार्ड संघटनेच्या बैठका झाल्या.
मागण्यांसाठी चर्चाकरण्यासाठी सरकारला शनिवार पर्यंत वेळ देण्यात आला होता.मात्र शनिवार आणि रविवारचा दिवस गेला तरी कोणतीही प्रतिक्रिया न आल्याने डॉक्टरांनी आता संपाचं हत्यार हाती घेतलं आहे. त्यामुळे राज्यासाठी ही मोठी चिंतेची बाब बनली आहे. मात्र चर्चेसाठी सरकारने कोणताही निर्णय न घेतल्याने त्यांनी संपाचा निर्णय घेतला आहे.
वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या १ हजार २३२ जागांची पदनिर्मिती.शासनाकडे हा प्रस्ताव रखडला आहे,शासकीय आणि महाविद्यालयात अपुऱ्या आणि मोडकळीस आलेल्या वसतिगृहामुळे होणारी विद्यार्थ्यांची हेळसांड,सहयोगी आणि सहाय्यक प्राध्यपकांची अपुरे पदे तातडीने भरणे,महागाई भत्ता तात्काळ देण्यात यावा,वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या वेतनातील तफावत दूर करत सर्व निवासी डॉक्टरांना समान वेतन लागू करणे,सर्व वरिष्ट निवासी डॉक्टरांना समान वेतन द्यावे अशा मार्ड डॉक्टरांच्या मागण्या आहेत.
COMMENTS