हेल्थ । नगर सह्याद्री - चेहऱ्यावर पिंपल्स आले की, सौंदर्य लपले जाते पण काही पिंपल्स असे असतात जे आपल्याला दिसत नाहीत ते त्वचेखाली असतात. सा...
हेल्थ । नगर सह्याद्री -
चेहऱ्यावर पिंपल्स आले की, सौंदर्य लपले जाते पण काही पिंपल्स असे असतात जे आपल्याला दिसत नाहीत ते त्वचेखाली असतात. सामान्य पिंपल्स त्वचेच्या वरच्या भागात विकसीत होतात, जे सहजपणे पाहिले जाऊ शकतात.
पण ब्लाईंड पिंपल्स त्वचेच्या आत विकसीत होतात. त्यामुळे ते तुम्हाला केवळ त्वचेवरील गाठीच्या रुपात जाणवतात. या पिंपल्सकडे दुर्लक्ष तुम्हाला चांगलंच महागात पडू शकतं. त्यामुळे या ब्लाईंड पिंपल्सबद्दल आम्ही तुमच्यासाठी माहिती घेवून आलो आहोत.
ब्लाईंड पिंपल्स येण्याचे कारणे
बॅक्टेरिया आणि डेड स्किन
मेडिकल हिस्टरी
फॅमिली हिस्टरी
कॉस्मेटिक चे साइड इफेक्ट
वायू प्रदूषण
एक्सफोलिएशन
त्यावरील उपाय काय?
1. वार्म कम्प्रेस
गरम शेक दिल्याने ब्लाइंड पिंपल्स दूर करण्यात मदत मिळते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे याने पिंपल्समध्ये होणाऱ्या वेदना दूर होतात. तसेच उष्णतेमुळे तुमच्या त्वचेची रोमछिद्रे मोकळी होण्यास मदत मिळते. यामुळे पिंपल्स त्वचेवर येतात. त्यासोबतच याने बॅक्टेरिया त्वचेच्या बाहेर येण्यासही मदत मिळते.
2. स्टीम घ्या
ब्लाईंड पिंपल्स पासून बचाव करण्यासाठी तुम्ही स्टीम घेवू शकता,त्यामुळे त्वचेची छिद्रे उघडते आणि घाण बाहेर पडते. पिंपलला स्पर्श करू नका हे नेहमी लक्षात ठेवा.
3. मध
मध हे पिंपल्स घालवण्यासाठी खूप फायदेशीर आहे.रात्रभर मध चेहऱ्यावर लावून ठेवा आणि सकाळी थंड पाण्याने चेहरा धुवा.
4. आइस क्यूब
उन्हाळ्यात पिंपल्सच्या समस्या जास्ती होतात त्यामुळे त्वचेची आग होते त्यावर आइस क्यूब लावल्यावर आराम मिळते त्यासाठी चेहरा स्वच्छ करा आणि आइस बॅग १ तासातून २ ते ३ वेळा पिंपल्सवर लावा.
5. पिंपल्स फोडू नका
चेहऱ्यावर ब्लाईंड पिंपल्स दिसत नाहीत ते त्वचेच्या आत असतात ते तुम्हाला जाणवतात अश्या वेळेस पिंपल्स दाबू नका किंवा त्याला फोडण्याचा प्रयत्न करू नका त्यामुळे त्वचेवर डाग पडू शकतात, परंतु पिंपल्स बरे होत नाहीत, असे केल्याने पिंपल्स आणखी वाढू शकतात.
COMMENTS