मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचा आज वाढदिवस. दीपिका आणि तिचा नवरा रणवीर सिंग यांच्या नात्याची नेहमीच चर्चा होताना दिसते. दीपिका पा...
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचा आज वाढदिवस. दीपिका आणि तिचा नवरा रणवीर सिंग यांच्या नात्याची नेहमीच चर्चा होताना दिसते. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या दुराव्या आल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. सोशल मीडियावर एका ट्विटमधून त्या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा आहे. तसंच हे दोघं लवकरच वेगळे होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. ही बातमी आल्यानंतर दोघांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर या जोडीनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या नात्याबद्दल ज्या बातम्या आल्या आहे त्या चुकीच्या असल्याचं सांगितलं होतं. दीपिका अभिनेत्री आणि डचेस ऑफ ससेस मेघन मार्कल हिच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाली होती. टाइम्स नाऊ वेबसाईटनं दिलेल्या बातमीनुसार दीपिकानं या पॉडकास्टमध्ये रणवीरबद्दल मोकळेपणानं भाष्य केलं. ती म्हणाली रणवीर जेव्हा परत येतो तेव्हा तिला खूप आनंद होतो. दीपिका सध्या तिच्या आगामी प्रोजेटमध्ये खूपच व्यग्र आहे. अलिकडेच दीपिका लुई वीटॉनसाठी पॅरिस फॅशनविकमध्ये सहभागी झाली होती. दीपिकानं मुलाखतीमध्ये पुढं सांगितलं की, ’मी आणि रणवीर कामासाठी घरापासून लांब असतो. रणबीर देखील एका म्युझिक कॉन्सर्टसाठी बाहेर होता. घरी आल्यानंतर जेव्हा त्यानं माझ्याकडे पाहिलं तेव्हा त्याच्या चेहर्यावर हसू उमटलं.’ दरम्यान, काही दिवसांपूर्वी रणवीर आणि दीपिका यांच्या नात्यामध्ये दुरावा आल्याच्या बातम्या आल्या होत्या. सोशल मीडियावर एक ट्विट करण्यात आलं होतं. त्यात म्हटलं होतं की, दीपिका आणि रणवीर यांच्या नात्यामध्ये तणाव आला आहे. लवकरच ते विभक्त होण्याची शयता आहे. ही बातमी वार्याच्या वेगानं पसरली. त्यांतर चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. त्यानंतर रणवीरनंतर या बातम्या खोट्या असल्याचं सांगितलं.
COMMENTS