मुंबई- बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान व अभिनेत्री दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत असलेला पठाण चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपट...
मुंबई-
बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान व अभिनेत्री दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत असलेला पठाण चित्रपट 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातील बेशरम रंग गाणं वादाच्या भोवर्यात अडकलं होतं. भगव्या रंगाची बिकिनी घालून रोमान्स केल्यामुळे दीपिका व शाहरुखानवर टीका केली होती. बेशरम रंग गाण्यावर काही दिवसांपूर्वीच शाहरुख खानने त्याची प्रतिक्रिया दिली. आता प्रदर्शनाच्या एक दिवस आधी दीपिकाने या गाण्यावर मौन सोडत तिचं मत व्यक्त केलं आहे.
पठाणफचित्रपटाची निर्मिती केलेल्या यश राज फिल्म्सने नुकताच दीपिकाच्या मुलाखतीचा व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. या मुलाखतीत दीपिकाने या चित्रपटातील गाण्याबाबत तिचं मत व्यक्त केलं आहे. बेशरम रंग व झुमे जो पठाण या पठाण चित्रपटातील गाण्यांपैकी तुझं आवडतं गाणं कोणतं? असा प्रश्न दीपिकाला विचारण्यात आला. यावर उत्तर देताना ती म्हणाली, दोन्ही गाणी माझी आवडती आहेत. त्यामुळे हे सांगणं फार कठीण आहे. दोन्हीही गाणी वेगळी आहेत. \
पण बेशरम रंग गाण्यासाठी मला जास्त मेहनत घ्यावी लागली. हे एक प्रकारचं माझं सोलो सॉँगचं होतं. ज्या ठिकाणी हे गाणं शूट करण्यात आलं, ते फारच कठीण होतं. कारण, तिथे वारा सुटल्यामुळे फार थंडी वाजत होती. दीपिका पुढे म्हणाली, ही दोन्ही गाणी चित्रीत करताना मी आनंद घेतला. मला फार मजा आली. शाहरुख खानबरोबर गाणं चित्रीत करणं मी एन्जॉय केलं. डान्स करताना आम्ही स्टेप्सचा फार टेक्निकली विचार केलेला नाही. आम्ही फक्त स्टेप्स समजून घेतल्या व त्या करताना त्याचा आनंद घेतला. त्यामुळेच दोन्हीही गाणी हिट ठरली.
COMMENTS