दोन दिवसीय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कार्यशाळा पारनेर | नगर सह्याद्री- राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये महाविद्यालयांना निश्चित उद्दिष्ट ठरवून शै...
दोन दिवसीय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कार्यशाळा
पारनेर | नगर सह्याद्री-
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये महाविद्यालयांना निश्चित उद्दिष्ट ठरवून शैक्षणिक वाटचाल करावी लागणार आहे. स्थानिक भूमीपुत्रांना आदर्श नागरिक व रोजगार मिळवून देणे ही शिक्षणाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. औद्योगिक क्षेत्राची जी मागणी आहे त्या अनुषंगाने कौशल्य विकसित करण्याची महाविद्यालयांची जबाबदारी आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरणचे संचालक डॉ. धनराज माने यांनी केले.
पारनेर येथील न्यू आर्टस्, कॉमर्स अॅण्ड सायन्स महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंमलबजावणी या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार नंदकुमार झावरे पाटील होते.
डॉ. धनराज माने पुढे म्हणाले, औद्योगिक क्षेत्राची जी मागणी आहे त्या अनुषंगाने कौशल्य विकसित करण्याची महाविद्यालयाची जबाबदारी नव्या धोरणात आहे. या धोरणात कला, वाणिज्य व विज्ञान शाखा एकत्र जोडली जाणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण रोजगार देण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करेल.
कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदकुमार झावरे पाटील म्हणाले, पारनेर परिसरातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे. यासाठी न्यू आर्टस्, कॉमर्स ण्ड सायन्स महाविद्यालय नेहमी आग्रही आहे. सुपा औद्योगिक वसाहतीला आवश्यक असणारे मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी कौशल्यविकासाचे अभ्यासक्रम महाविद्यालयाने सुरु केले आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होणार आहेत. बदलत्या काळाला अनुसरून कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रमाची रचना करणे ही काळाची गरज बनली आहे.
नवीन शैक्षणिक धोरणात आंतरविद्याशाखीय अभ्यासक्रमांना प्राधान्य राहणार आहे. त्यानुसार कला, वाणिज्य, विज्ञान, संगणकशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र इ. विद्याशाखातील विद्यार्थी विविध विषय घेऊन प्रमाणपत्र अभ्यासक्रम, डिप्लोमा, पदविका, पदवी प्राप्त करणार आहेत. बदलत्या काळाच्या अनुषंगाने आजच्या विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख कौशल्याधिष्ठित प्रमाणपत्र अभ्यासक्रम महाविद्यालय पातळीवर आगोदरपासूनच सुरु केले आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी हा होतकरू, परिस्थितीची जाणीव असणारा, प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करणारा असतो. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना उद्याच्या काळात रोजगार मिळावा त्यांना त्यांच्या आयुष्यात उभे राहता यावे. याचा सर्वांगीण विचार करून अभ्यासक्रम असायला हवा. असे ते म्हणाले.
कार्यशाळेच्या दुसर्या सत्रात डॉ. एस.पी.लवांडे यांनी मार्गदर्शन केले. स्वातंत्र्योत्तर काळात वैद्यकीय, कृषी, अभियांत्रिकी विद्यापीठे स्वतंत्रपणे सुरू झाली. परंतु राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात सर्व विशेष स्तरावर सुरू झालेल्या विद्यापीठांमध्ये बहुविद्याशाखीय अभ्यासक्रम सुरू करण्याची भूमिका राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची आहे. यानंतर डॉ. डी. डी. पाटील यांनी कार्यशाळेत अंतर्विद्याशाखिय शिक्षण या विषयावर मार्गदर्शन केले. कला, वाणिज्य व विज्ञान या पारंपरिक विषयांच्या बाहेर जाऊन एखाद्या विद्यार्थ्याला त्या शाखेव्यतिरिक्त दुसर्या शाखेतील एखादा विषय आवश्यकतेनुसार घेता येणार आहे. एखादे वाद्य येणार्या कलाकाराला त्या वाद्याचे विज्ञान समजून घ्यायचे असेल तर त्याला तो विषय घेता येईल. या शाखेव्यतिरिक्त मिळवलेल्या अतिरिक्त ज्ञानामुळे त्याला नवे मार्ग सापडू शकतात. त्यादृष्टीने या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात केलेले बदल अत्यंत महत्त्वाचे आहेत.
या कार्यशाळेत देशभरातून प्राध्यापक, विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांनी केले. तर आभार उपप्राचार्य डॉ. दिलीप ठुबे यांनी केले. या कार्यशाळेचे समन्वयक डॉ. दिपक सोनटक्के यांनी कार्यशाळेचे संपूर्ण नियोजन केले. तर सूत्रसंचालन डॉ. हरेश शेळके व डॉ. माया लहारे यांनी केल
COMMENTS