मुंबई / नगर सहयाद्री- मुंबईतील मालाड मध्ये ही एक धक्कादायक घटना घडली, गर्लफ्रेंड मिळवत नाही यासाठी तरुणाने जे कृत्य केलं ते पाहून पोलिसही चक...
मुंबई / नगर सहयाद्री-
मुंबईतील मालाड मध्ये ही एक धक्कादायक घटना घडली, गर्लफ्रेंड मिळवत नाही यासाठी तरुणाने जे कृत्य केलं ते पाहून पोलिसही चक्रावले आहेत. आरोपीच्या आईनेच मुलाविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे.
एका वृत्तसंस्थाच्या माहितीनुसार २२ वर्षांचा मुलगा डेंटिग अॅपच्या माध्यमातून अज्ञात महिलांचे आणि मुलींचे नंबर शोधायचा. त्यानंतर त्यांना अश्लील मसेज व व्हॉट्सअॅप मेसेज करायचा. आरोपीच्या आईनेच तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी लगेचच त्याचा फोन नंबर आणि लोकेशनचा तपास सुरू केला.
पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर एका तरुणाला ताब्यात घेतलं. पोलिस चौकशीत त्याने धक्कादायत खुलासा केला आहे. दुसऱ्या मुलांची गर्लफ्रेंड आहेत. पण मला कोणच पसंत करत नाही. माझीही एक गर्लफ्रेंड असावी अशी इच्छा होती. म्हणूनच डेटिंग अॅपच्या माध्यमातून मी महिलांना आणि मुलींचे नंबर शोधून त्यांना अश्लील मेसेज पाठवत होतो, अशी कबुली त्याने दिली आहे. हा आरोपी प्ले स्टोर आणि ऑनलाइन विवाहसंस्थाच्या वेबसाइटवर लग्नासाठी अपलोड केलेल्या मुलींच्या बायडेटावरुन त्यांचा नंबर आणि इतर माहिती घेत होता.
मालाड पोलिसांनी एका २२ वर्षांच्या मुलाला अटक केली आहे. आरोपी पोलिस ठाण्यातच पाण्याची डिलिव्हरी करण्याचं काम करतो. त्याला त्याच्या आईच्या तक्रारीवरुनच अटक करण्यात आली आहे. आईच मुलाची तक्रार घेऊन आल्यानंतर पोलसही चक्रावले होते. मात्र, प्रकरण गंभीर असल्याचे पाहून पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे.
COMMENTS