नाशिक / नगर सहयाद्री- नाशिकच्या सिन्नर शहरात चित्रपटाला साजेशी घटना घडली आहे. एका व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण सायंकाळी झाले होते. पोलीस ठा...
नाशिक / नगर सहयाद्री-
नाशिकच्या सिन्नर शहरात चित्रपटाला साजेशी घटना घडली आहे. एका व्यापाऱ्याच्या मुलाचे अपहरण सायंकाळी झाले होते. पोलीस ठाण्याच्या समोरील रस्त्यावरून जात त्यांनी मुलाच्या वडिलांना फोन करून पैशाची मागणी केली होती.
सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान चिराग तुषार कलंत्री हा मुलगा खेळत असतांना त्याचे अपहरण करण्यात आले होते, त्यामध्ये ओमणी गाडीतून त्याला घेऊन गेल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे होते. काही वेळातच ही बाब घरात सुरू असतांना चिराग तुषार कलंत्री यांना अपहरण केल्याचा फोन आला, त्यामध्ये धमकी देत पैशाची मागणी करण्यात आली होती.कलंत्री यांनी तात्काळ पोलिसांना ही बाब कळवली, परिसरातील सीसीटीव्ही तपासण्यात आले त्यामध्ये ओमणी गाडी भरधाव वेगाने जात असल्याचे समोर आले.
अपहरण कर्त्यांनी गुरेवाडी येथून कॉल केल्याने पोलिसांना तिथपर्यंत मोबाईल लोकेशन मिळाले होते, त्यानंतर अपहरण कर्त्यांनी मोबाइल स्विचऑफ केल्याने पोलिसांसमोरील अडचणी वाढल्या होत्या. त्यामध्ये अपहरण कर्त्यांना पळून जाण्यात यश न आल्याने काही तासातच अपहरण कर्त्यांनी मुलाला त्याच्या घराजवळ सोडून पळ काढला आहे.
COMMENTS