औरंगाबाद / नगर सहयाद्री - औरंगाबाद शहरातील आनंदनगर भागात एक धक्कादायक घटना घडाल्याची बातमी समोर अली आहे. एका विवाहीत महिलेने गळफास घेत आत्मह...
औरंगाबाद / नगर सहयाद्री -
औरंगाबाद शहरातील आनंदनगर भागात एक धक्कादायक घटना घडाल्याची बातमी समोर अली आहे. एका विवाहीत महिलेने गळफास घेत आत्महत्या केली आहे. २ वर्षांच लहान बाळ असताना देखील तिने आपले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला आहे. महीलेने हे टोकाचे पाऊल नेमके का उचलेले हे अद्याप समजले नाही.
एका वृत्तसंस्थाच्या मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचा पती नोकरीवर गेल्यानंतर आत्महत्या केली आहे. यावेळी तिने अवघ्या २ वर्षांच्या मुलीला टीव्हीवर कार्टून लाऊन दिले आणि ती बेडरूममध्ये गेली. इथे तिने स्वत:ला गळफास लावत आत्महत्या केली. थोड्याच वेळात मुलगी आई ला पाहू लागली आणि बेडरूममध्ये पोहचली. आईला अशा अवस्थेत पाहून त्या चिमुकलीला नेमके काय घडले आहे हे देखील समजले नाही.
आपली आई काही हालचाल करत नाही असे तिच्या लक्षात आले आणि ती खाली बसून जोरजोरात रडू लागली. मुलीचं रडणं ऐकूण आई नेहमीच तिला जवळ घेत होती. मात्र यावेळी तसं काही झालंच नाही. आई बरोबर काय घडलंय, आई आता या जगात नाही हे काहीच चिमुकलीला समजत नव्हते. पण आईने आपल्याला घ्यावे यासाठी ती बराच वेळ रडत राहिली.
मुलीच्या रडण्याचा आवाज शेजारी देखील ऐकत होते. तिची तब्येत ठिक नसल्याने ती रडत असावी असे त्यांना सुरूवातीला वाटले. मात्र रडण्याचा आवाज काही थांबत नव्हता. चिमुकली खूप वेळची जोरजोरात रडत होती. म्हणून शेजारी महिलेच्या घरी पोहचले. इथे त्यांनी चिमुकलीचा आवाज घेत बेडरूममध्ये पोहचले. बेडरूममधलं दृश्य पाहून सर्वाच्याच काळजाचा थरकाप उडाला. त्यांनी लगेचच बाळाला तेथून उचलून बाहेर आणले आणि पोलिसांना सदर घटनेची माहिती दिली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
COMMENTS