अहमदनगर / नगर सहयाद्री - अहमदनगर जिल्ह्यातील कोतूळ येथे रस्त्याच्या वादातून माजी सरपंचाच्या कुटुंबीयांनी तीन जणांवर जीवघेणा हल्ला केल्याची घ...
अहमदनगर / नगर सहयाद्री -
अहमदनगर जिल्ह्यातील कोतूळ येथे रस्त्याच्या वादातून माजी सरपंचाच्या कुटुंबीयांनी तीन जणांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. यावेळी वाद सोडवण्यासाठी गेलेले पोलीस पाटील देखील जखमी झाले आहे.
एका वृत्त संस्थाच्या माहितीनुसार, अकोले तालुक्यातील कोतूळ येथे जुना पैठण रस्ता हा आरोपी कुटुंबाच्या शेताशेजारून जात होता. मात्र काही वर्षांपासून आरोपी यांनी या रस्त्यावर शेती करून तो बंद केला. या विरोधात आनेक लोकांनी तहसील, प्रांत, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांकडे रीतसर पुरावे दिल्याने सर्व ठिकाणी आरोपी च्या विरोधात निकाल गेला.
त्यानंतर पोलीस आणि महसूल विभागाने हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. मात्र तरीही चार दिवसांपूर्वी ह्या कुटुंबाने या रस्त्यावर घराचे काम सुरू केले. ही तक्रार काही लोकांनी तहसीलदार अकोले पोलिसांकडे केली.
याचाच राग मनात धरून काल आरोपीच्या कुटूंबानी, गज, खोरे, दगड तसेच धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला. यात तिघेही गंभीर जखमी झाले असून वाद सोडवण्यासाठी गेलेले कोतुळ गावचे पोलीस पाटील हे देखील जखमी झाले आहेत.
COMMENTS