मुंबई / नगर सहयाद्री- प्रेयसी सोबत राहत नसल्याचा व संबंध ठेवत नसल्याचा राग मनात धरत प्रियकराने धक्कादायक कृत्य केल्याची घटना पालघर येथे घड...
मुंबई / नगर सहयाद्री-
प्रेयसी सोबत राहत नसल्याचा व संबंध ठेवत नसल्याचा राग मनात धरत प्रियकराने धक्कादायक कृत्य केल्याची घटना पालघर येथे घडली आहे. प्रियकराने प्रेयसीच्या मोठ्या बहिणीच्या मुलाचे शाळेतून अपहरण केले. त्यानंतर रोख रक्कमेची व प्रेयशीच्या बहिणीकडे प्रेयसीला घरी पाठविण्याची मागणी केली. याप्रकरणी अपहरण करणाऱ्या आरोपीस अटक करून तलासरी पोलिसांनी अवघ्या काही तासात अपहरण झालेल्या मुलाची सुखरूप सुटका केली.
आरोपी युट्युबर आणि आदिवासी सिंगर असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. राजेश धोदडे असे आरोपीचे नाव असून फिर्यादी महिलेच्या बहिणी सोबत त्याचे गेल्या 4 वर्षांपासून प्रेम संबंध होते. परंतु चार वर्षांपासून संबंध असून प्रियसी लग्नास चाल ढकल करत होती.
प्रियकराशी संबंध न ठेवण्यास प्रेयसीची बहीण भाग पाडत होती.याचाच राग मनात धरत प्रियकराने प्रेयसीच्या मोठ्या बहिणीच्या 8 वर्षीय मुलाचे सोमवारी 9 जानेवारी रोजी शाळा भरण्यापूर्वी अपहरण केले. आरोपीचे फोन लोकेशन्स व इतर माहितीच्या आधारे तपास करत आरोपीस चारोटी येथून अटक केली.
आरोपीच्या माहिती वरून अपहरण झालेल्या मुलाला केंद्र शासित प्रदेश सेलवास खानवेल येथून यशस्वी रित्या ताब्यात घेत सुटका करून आईच्या स्वाधीन केले. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
COMMENTS