नांदेड / नगर सहयाद्री- जन्मदात्या आई ने आपल्या पोटच्या दोन चिमुकल्यांना विहिरीत फेकल्याची भयानक घटना नांदेडमध्ये घडली आहे. घटने दोन्ही चिमु...
नांदेड / नगर सहयाद्री-
जन्मदात्या आई ने आपल्या पोटच्या दोन चिमुकल्यांना विहिरीत फेकल्याची भयानक घटना नांदेडमध्ये घडली आहे. घटने दोन्ही चिमुकल्यां दु्र्दैवी मृत्यू झाला आहे. पतीसोबत झालेल्या भांडणानंतर महिलेने हे क्रूर पाऊल उचललं आहे. पती आपल्याला हैदराबाद येथे सोबत नेत नाही म्हणून महिलेने रागाच्या भरात हे पाऊल उचललं.
एका वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, सदर घटना नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील गुत्ती तांडा येथे काल घडली आहे. महिलेचा नवर हा हैदराबाद येथे खाजगी कंपनीत काम करतो. पतीने आपल्याला हैदराबादला घेऊन जावं अशी पत्नीची इच्छा होती.यासाठी पत्नी ने पती जवळ तगादा लावला होता. यातून दोघांमध्ये कडाक्याचे भांडणे झाले. याच भांडणानंतर रागाच्या भरात पत्नी ने तीन वर्षाचा मुलगा आणि चार महिन्याच्या मुलीला जवळच असलेल्या विहीरीत फेकले.
गावातील लोकांना हा प्रकार दिसल्याने त्यांनी तातडीने दोघांनाही विहिरीतून बाहेर काढले. मात्र दोघांचाही यात मृत्यू झाला. याप्रकरणी क्रुर आई वर मरखेल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
COMMENTS