नागपूर वृत्तसंस्था पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत एका नराधम बापाने आपल्या दोन दिवसांच्या बाळाला थेट फरशीवर आपटलं.या घटनेत बाळ गंभीर जखमी झ...
नागपूर वृत्तसंस्था
पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत एका नराधम बापाने आपल्या दोन दिवसांच्या बाळाला थेट फरशीवर आपटलं.या घटनेत बाळ गंभीर जखमी झाला आहे.त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.
घटनेचा परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.नागपुरच्या मेडिकल या शासकीय रुग्णालयातील महिला उपचारासाठी दाखल झाली होती.यावेळी या महिलेचा पती हा तिथे आला. दोघांमध्ये काही कारणास्तवरून बाचाबाची झाली. या बाचाबाचीत आरोपी याने आपल्या दोन महिन्यांच्या बाळाला उचलून घेत थेट फरशीवर आपटलं.
या घटनेत बाळाला गंभीर जखमी झाल असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे.याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी या नराधम बापास अटक केली आहे
COMMENTS