मुंबई / नगर सहयाद्री- पैशाच्या हव्यासापोटी सख्या आईनेच पोटच्या १६ वर्षीय मुलीला तिच्या तिप्पट वयाच्या वृद्ध चक्कीवाल्यासोबत शरीर संबंध ठेवण...
मुंबई / नगर सहयाद्री-
पैशाच्या हव्यासापोटी सख्या आईनेच पोटच्या १६ वर्षीय मुलीला तिच्या तिप्पट वयाच्या वृद्ध चक्कीवाल्यासोबत शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले. ही नात्याला काळीमा फासणारी घटना अंधेरी पश्चिम भागात घडली आहे. मागील दीड वर्षांपासून चक्कीवाल्याकडून सुरू असलेल्या या अत्याचाराबाबत मुलीनेच आवाज उठवला असून तिने या संदर्भात डी एन नगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
अंधेरी पश्चिमेला पीडित मुलगी आपल्या आई सोबत राहत होती वडिलांचे आकस्मिक निधन झाल्यानंतर आपल्या मुलीलाही परिसरातील फ्लोअर मिलमध्ये कामास पाठवण्यास सुरुवात केली मात्र तिथे कामाऐवजी चक्की वाल्याकडून मुलीवर अत्याचार करण्यास सुरुवात झाली. ही बाब पीडित मुलीने आपल्या आईला सांगितली.
मुलीच्या या तक्रारीकडे आईने दुर्लक्ष केले. तुझे ते कामाच आहे, ते तुला करावेच लागेल असे सांगून तिच्यावर दबाव आणला. गेल्या नोव्हेंबर पर्यंत मुलीवर अत्याचार सुरू होते. चक्की वाल्याच्या दुष्कृत्यातून सुटका करून घेण्यासाठी मुलीने पोलिसात धाव घेतली.
मुलीवर झालेल्या अत्याचाराची कहाणी ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. मुलीने आपली आई आणि त्या चक्कीवाल्या विरोधात तक्रार नोंदवल्यानंतर गुन्हा दाखल करून पोलिसांनी तिची आई आणि अत्याचार करणाऱ्या चक्की वाल्याला ताब्यात घेतले आहे.
COMMENTS