औरंगाबाद / नगर सहयाद्री- औरंगाबाद येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून एका उच्चशिक्षित पतीने आपलाच पत्नी आणि अडीच ...
औरंगाबाद / नगर सहयाद्री-
औरंगाबाद येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून एका उच्चशिक्षित पतीने आपलाच पत्नी आणि अडीच वर्षाच्या मुलाची गळा आवळून हत्या केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.
औरंगाबादच्या सातारा पोलीस ठाणे हद्दीतील कांचनवाडी परिसरात समीर मस्के हा आपल्या पत्नी आणि दोन वर्षांच्या मुलीसह राहत होता. मात्र आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर तो नेहमी संशय घेत होता. समीर याने आपली आई सुनिता विष्णु म्हस्के यांच्या सांगण्यावर आपल्या पत्नीची हत्या केली आहे. समीरने आधी पत्नी आरतीच्या तोंडात कापडी बोळा कोंबला. यावरून अनेकदा त्यांच्यात वाद देखील होत होता. दरम्यान काल रात्री पुन्हा यावरून वाद झाला. त्यानंतर समीर मस्के यांनी घरातील मोबाईल चार्जरच्या वायरने पत्नी आरती आणि मुलगी निशात यांची गळा आवळून हत्या केली.
ही घटना औरंगाबाद शहरातील कांचनवाडी भागात घडली. सातारा पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतले आहे. आरोपीच्या आईचाही यामध्ये समावेश आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिली.
चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीचा आणि अडीच वर्षाच्या बाळाचा गळा आवळून खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. दरम्यान घटना घडल्यानंतर आरोपीने खुद्द पहाटे २ वाजता पोलिसांना आपण खून कलेल्याची माहिती दिली.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीला अटक केली आहे.
COMMENTS